रविवार, २४ एप्रिल, २०११

...........ढेबरी ताई......... राजेंद्र बाणाईत on Sunday, 24 April 2011 at 01:44

चाळीमध्ये गोट्यांचा खेळ रंगात आला होता ...माझ्या गोटया बर्यापैकी मी हरवून बसलो होतो .....दुपारचे चार -पाच वाजले होते ...एका बाजूला चाळीतील शिंद्यांची गादी पिंजारी नीट करत होता ...त्रोन्ग त्रोन्ग असा नाद मधेच तो काढायचा ...अचानक एक छोटा ट्रक सामान घेऊन जगतापच्या घरापाशी थांबला ...एक नुकतेच टक्कल केलेला माणूस केबिन मधून बाहेर पडला ...मागच्या बाजूने त्याने ट्रक मधून दोन टक्कल केलेली मुले बाहेर काढली ...नंतर एका मुलीला हाक मारून ...ताई ....ताई असे ओरडून बाहेर निघायला सांगितले .ट्रकवाल्याने एका चार वर्षाची एक जाडी पोट फुगलेली बुटकी चिमुरडी पोर बाहेर काढली .......तिचेच नाव ताई ....!

मुलाची आई वारल्याने बापाने सामान आणि पोरे घेऊन मोठ्या भावाकडे काही दिवसासाठी आणले होते ....मोठा मुलगा राम ...मधली ताई ...छोटा सुरेश ....सारे अवघडलेल्या मनाने ,भिरभिरत्या नजरेने सामान उतरवत असताना इकडे -तिकडे पाहत होते ...जगतापबाई कुठूनतरी येत होती ....तो ट्रक ..ती पोरे ..तिचा दीर पाह्यल्यावर तिथूनच शिवीगाळ करत आली ...माझेच घर बरे दिसले ..कारे भाडखावू....बायको मारली ..आता माझ्याकडे कशाला आलास .....काकुच्या ओरडण्याने पोरे रडू लागली ....जगतापबाईला दोन मुली ..आनू आणि रेणू ....जगतापबाबा बाहेर आला ..ते अंडरप्यांटवर ...बायकोला चार -दोन शिव्या देऊन म्हणाला ..माझा भाऊ आहे ,,मीच बोलावले आहे त्याला ....तू तुझी आई घाल तिकडे .....राहील कि सोय होईपर्यंत नंतर निघून जाईल ...उरावर बसायला आला नाही तो तुझ्यावर .......

हा सारा तमाशा सारी चाळ पाहत होती ....या सगळ्या नादात आमचे वडील आले आणि त्यांनी सर्व पोरांना शिव्या देवून हुसकावून लावले ....सगळ्यांना घरी जा असे हातवारे करत ...सायकल लाऊन घरात गेले ....मी ट्रकच्या पाठीमागे लपून सारे बघत होतो ...रामच्या कडेवरची ताई रडत होती ....तिची ढेरी फ्रोक मधून बाहेर दिसत होती ....सारेच चित्र उदासवाणे .......

.....ट्रक निघून गेला ...मी रामला दोस्त केले ...थोड्या गप्पा मारल्या ...त्याने सांगितले ..आमची आई मेली वीस -पंचवीस दिवस झाले ...आम्हाला या काकाशिवाय दुसरे कोणी नाही ..वडिलाची आई आहे ,पण ती म्हातारी आहे .मी त्याला म्हणालो ..काही लागल्यास मला सांग..

..दुसर्या दिवशी शाळेत पाहतो तर काय ...राम माझ्या शाळेत दाखल झाला त्याच्या लहान भावाबरोबर ...मधल्या सुट्टीत मी त्याला शाळा दाखवली .....शाळा संपल्यावर घरी सोबतच आलो ...आमच्या घरी त्याला नेले ...आईला आणि बहिणीला सांगितले हा राम ...चाळीत तोपर्यंत जगतापबाईने सारे रामायण सांगितले होतेच ..त्यामुळे आईला त्याच्याविषयी कळले होते ....

...थोड्यावेळाने तो ताईला आमच्या घरी घेऊन आला ...खेळायला .....ताई गोरीपान होती ..केसाच्या बटा झाल्या होत्या ...तीचे डोळे काळे करावान्दासारखे होते ....बोलायची तर फार गमतीशीर ...म्हणजे मधेच बोलताना हसायची ...आणि अंगाला हात लाऊन बोलायची ....मी म्हणालो काय ताई ...? खाऊ खायचा का ? यावर ती बोबड्या आवजात म्हणाली ..तुझे हात तर रिकामे आहेत ..? तू कायपण बोलतोस ...सगळे हसले ...मला जाम कौतुक वाटले तीचे....आईने रामला विचारले ....,राम हिची ढेरी मोठी कशी काय रे ? राम म्हणाला ..ती माती खूप खाते ....जेवण जास्त करत नाही ....मला काही कळले नाही ...मी आपला थोड्यावेळ खेळलो आणि अभ्यासाला बसलो ....

तीन -चार महिने गेले ...ताईला दवाखान्यात दाखल केले ...तिला नुसते जुलाब होत होते ....काही दिवसांनी तिला घरी आणले ..तिच्या हातापायाच्या काडया झालेल्या आणि पोट मोठेच राहिलेले ....त्यांचा बाप दुसर्या गावाला निघून गेला नवीन बदलीचे ठिकाण बघायला ......मुलाचे खाण्याचे हाल सुरूच होते ...राम भावाचे धुणे ..ताईचे धुणे आणि बाकीचे सारे कामे करायचा ......चुलता रोज दारू पिऊन ताईला चाळीभोवती फेर्या मारायला लावायचा ...का ...?...तर डॉक्टरने सांगितले म्हणून .....ताईला चालवत नसायचे ..ती चार -साडेचार वर्ष्याची पोर ...स्वताची ढेरी हलवत चालताना मधेच पडायची ....कुणी तिला धरले कि अंडरप्यांटवाले जगताप सर्वाना शिव्या घालायचे ....घोगर्या आवाजात ओरडायचे ...ताई थांबू नको ......तो आवाज ऐकला कि ताई मुसमुसत ..,गळके नाक हाताला पुसत ...चालायची ....मग काही वेळाने राम यायचा ..तिला पटकन कडेवर घेऊन पळत सुटायचा ...तोपर्यंत जगताप पायरीवर पिऊन आडवा झालेला असायचा .......राम तिला बाहेर फिरून आणायचा ...येताना गुलाबी साखरेचा कापूस घेऊन यायचा ........तिच्या डोळ्यात त्यावेळेला एक चमक दिसायची .....

..एक दिवस आम्हाला शाळेला सुट्टी होती ...आम्ही सारे गोट्या खेळत होतो ...ताईपण जवळ बसली होती .......खेळ रंगात आला असताना ...ताईने जागेवरच जुलाब करायला सुरवात केली ...ताईला श्वासपण घेताना त्रास होत होता ...रामने ताईला नीट आवरून चाळीतल्या शिंदेबाईला घेऊन तडक दवाखाना गाठला ......

.................दोन दिवसाने कळले ताई मेली .....आयुष्यात प्रथमच मी लहान मुलाची प्रेतयात्रा पाहत होतो .....आम्हाला सगळ्यांना घरी बसवण्यात आले होते ....राम फक्त गेला होता .

............दोन -तीन महिन्यांनी राम ,त्याचा भाऊ .,वडील दुसर्या ठिकाणी निघून गेले ...बारकासा ट्रक आला ....गाडीच्या पाठीमागे सामान धरत राम उभा होता ......माझ्या हातात रामने मला जिंकून दिलेल्या गोट्या होत्या .....त्यातली एक गोटी ताईच्या करवंदी डोळ्यासारखी चमकत होती ......बर्याचवेळ ........................................................ताई तू कुठे आहेस ग ?मला तुझी आठवण येतेय ..!

....


मंगळवार, ८ मार्च, २०११

वाळीत टाकलेला माणूस ........... by Rajendra Banait on Monday, 07 March 2011 at 16:26


मध्यरात्री चोरपावलाने तो उठला ...पायात चपला अडकवल्या .खिसे चापपले काही पैसे आहेत ,हे जाणवल्यावर त्याला हायसे वाटले ....नाक्यापर्यंत चालत गेला ...सिगारेट पेटवून तो एस .टी.स्थानकाकडे जाणार्या बसची वाट पाहत राहिला .......सकाळचा प्रसंग आठवला ..आणि डोळ्यातील दाटून आलेले कढ बाहेर निघायला लागले .....गल्लीत एका माणसाला त्याने खूप मारले ...त्या माणसानेही खूप मारले ...कारण काय होते ...तो माणूस याला म्हणाला ..माहितीय  तू फार हुशार आहे ..ज्या साठी बोललो ती माणसे केंव्हाच गायब झालेली ....घरातील  लोकपण म्हणाली नसती हुशारी कशाला करायची ...इतके वाटत असेल तर बाहेरच्या लोकांची सेवा करायची आणि त्यांच्या बरोबर बाहेरच राहायचे .....तुम्ही मेलात तर घरचे रडतील बाहेरचे येतील का ? असल्या  अनेक प्रश्नांना  तो कायम  निरुत्तर व्हायचा ...शिकला खूप ...लोकांना डिग्र्यापण कळायच्यात नाही .
शेवटची बस आली ..सिगारेट विझवून तो बस मध्ये बसला ....बरेचसे प्रवासी याच्याकडे रोखून पहिला लागले ....कंडक्टर म्हणाला ...शर्ट-बनियन आहे का नाही पाव्हणे ....दारू उतरली का नाही अजून ? याच्या लक्षात आले आपण फक्त प्यांट घातलीय ...तो कसनुसे हसला ....नाही हो मी दारू नाही पित...विचाराच्या  नादात  विसरलो ...बसमधला एक पोक्त माणूस म्हणाला ..घरी भांडण झाले काय मर्दा..?....त्याने गपचूप तिकीट काढले ....काही न बोलता बसून राहिला ....बर्याच दिवसांनी कोणीतरी  आपल्याला मर्द म्हणाल्यामुळे तो आनंदी झाला ....दहावीला असताना वर्गात मारामारी झाली ..पोरांनी  गणिताच्या सरांना दणकून मारले ....हा  सरांची बाजू घेऊन पोलिसांपर्यंत गेला ......तेंव्हा गणिताचे सर म्हणाले ...तू  मर्द आहेस ..! पोलिसांनीपण याचे कौतुक  केले .....
एस .टी. स्थानक आले ....बसमधून हा उतरला .....मगाचा पोक्त माणूस म्हणला...घरी जा मर्दा ...डोक्यात राख घालून  काही मिळत  नाही ....हा काही न बोलता ...स्थानकावर आला ...सिगारेट पेटवली ....शेवटचे बंड करावे का ? या विचारात तो पडला ...हे शहर सोडून सरळ आदिवासींमध्ये जायचे  किंवा  आपली  भाषा जिथे  बोलली जात नाही अश्या प्रदेशात  जायचे .......आई ,बाप , बहिण .बायको .तीन मुली ,या सर्वाना सोडून जायचे ......?त्याला काही कळेना .....डोके चालेना ...काय करावे समजेना ......या विचारात असताना तो पोक्त माणूस त्याच्या शेजारी आला ....म्हणाला ..मर्दा कधी दारू प्याली का नाय ? हा म्हणला नाही हो .....एक काम कर मर्दा माझ्यासंगट पिऊन बघ ....
,,,,,,,,,,,,,,,,,,,हा पहिल्यांदा दारू पिला....खूप रडायला लागला ...रडत म्हणाला ...शहाण्या माणसाचा  समाजाला उपयोग  नसतो ....शिकून काही भेटत नाही ...मित्र -बित्र ...सगळे झुठ ......आई -बाप जन्म देतात ....बायको तिच्याच नादात ....त्याच्या गप्पा ऐकून  तो पोक्त माणूस म्हणाला ...गड्या तू चांगला आहेस ...पण ही दुनिया नाही न तशी ......मी एके काळाचा पहिलवान होतो ...लोक मला घाबरायची .....पण माझी काळीज सश्याचे व्हतं..........याला दारू चांगलीच चढली होती .....काहीपण बरळत तो स्वताशीच  म्हणत होता ...लोकांनी मला ओळखले नाही .....मी काय असे केले ...माझा सगळे राग -राग करतात ......
पोक्त माणसाने याच्या खिशातले पैसे काढले आणि हळूच निघून गेला ........कंट्री बारच्या शेजारी मोठ्या बिल्ड्निगीचे काम चालू होते ...तिथल्या  वाळूच्या ढिगात हा बरळत झोपी गेला .....!!!



उन्हात झोपलेला माणूस ........... by Rajendra Banait on Wednesday, 09 March 2011 at 01:09


भर उन्हाचा .......वाहत्या रस्त्याच्या कडेला तो खुशाल झोपला होता .....कोणालाही वाटेल  त्याला पाहून हा नक्की दारुडा आहे .....गेली काही वर्ष्ये तो कुठेही जेवायचा ...आणि झोपायचा देखील .....कार्पोरेशनच्या कृपेने  बरीच झाडे लावली होती ...त्यात  दिखावा म्हणून  कृत्रिम हिरवळ .....त्याच्या सारखे  कसे  झोपतात  भर रस्त्यावरच्य  कडेला  ...समजत नाही .... हा आपला सकाळी वाचलेला पेपर अंथरून झोपलेला ....तोंडातून लाळ गळ्तीय...त्यात तोंडावर एक -दोन माश्या बसलेल्या ....हा पठ्ठ्या मात्र भर उन्हाचा घोरतोय........  कळत नाही ....त्याच्या अंगाखालच्या पेपर मधल्या काही बातम्याची शीर्षके फार मजेशीर होती ......केनियाचा धावपटू  पहिला .....पेट्रोलला पर्याय म्हणून अल्खाहोलचा  वापर  करायचा शासनाचा विचार ...संजय दत्तला पुन्हा अटक ...बेळगावात पुन्हा दंगल ....सातारा शहरात बांगलादेशी सापडला .....झीनत अमानला जीवन गौरव .....आज गुरुपुष्यामृत योग आहे गाडगीळ मधेच सोने खरेदी करा ,मजुरी  नाही .......निम्मेपान रंगीत जाहिरात ...ह्याने माशी नाकात गेल्याने कशीतरी कूस बदलली ......जोराचा वारा आला आणि पेपरचे ते मुख्य पान उडून  गेले


गाड्याचे हॉर्न कर्णकर्कश आवाज काढत होते .......त्यातून  रस्त्याच्या एका बाजूने एक सरबतवाल्याची हातगाडी तो जिथे झोपला तिथे येवून थांबली ....त्या गाडीचा मुसलमान मालक फार हौशी असावा असे वाटत होते ..त्याने गाडीला ब्याटरी लावून कारटेप लावला होता ....दोन स्पीकर एक वुफर ...गाणे लागले होते .....उड जायेगा पंछी इक दिन रहेंगा पिंजडा खाली ....पिंजडा खाली ......दोन -तीन टगी पोरे सायकलवरून चालली होती ...सरबताच्या गाडीपाशी येवून थांबली .....शिकनजेबी सांगून गाडीवाल्याची थोडीशी टर उडवण्याची हुक्की एकाला आली ....कोनसे गाव के ? सरबत बेचके कितना पैसा मिलता..?...याच्या कलकलाटाने याची झोप चाळवली...त्यात एका पोराने पाण्याची चूळ याच्या अंगावर उडवली ....तरी हा अर्धवट झोपेत  यांना म्हणाला ...भाऊ झोपू द्याना ...कह्याला उठवता ...एका टग्याला त्याची दया आली  म्हणाला ...मराठवाड्याचा का रे तू ..? हा झोपेत म्हणाला ...व्हय....गाडीवर गाणे लागले होते .....तुम तो टेहरे परदेसी  साथ क्या निभाओंगे .......टग्याने जबरदस्तीने गाडीवाल्याला  याला सरबत द्यायला सांगितले .....सरबत पिल्यावर हा जरा जागेवर आला ....एकाने विचारले ..काय रे ,,,किती शिकला .? हा म्हणला ..बी .ए . हिस्ट्री .....सारे क्षणभर  गप्प झाले ....
काही वेळाने हा परत तिथेच काही काळ  पसरून  राहिला ...कार्पोरेशनचे लोक झाडांना ,हिरवळीला  पाणी द्यायला आले ... त्यांनी  याला तिथून हाकलून दिले ..
.
....................हा काहीसा झोपेत एका सिंमेटच्या बाकावर येवून बसला ......घराची आठवण येऊन पोटात एकच गलबला उसळला ....सरबातावाल्याच्या गाडीवरून  फार लांबून स्वर आदळत होते ...क्या करोंगे तुम आखिर मेरी याद आतेही...आसुओके बारिशमे ये तुम्भी भिग जाओगे ...तुम टेहरे परदे ssssssssसी...............तुम टेहरे परदे ssssssssसी.....तुम टेहरे परदे ssssssssसी.... 

 · 

रविवार, ६ मार्च, २०११



तू येणार म्हणून म्हणून फुले आणली होती ...तुला द्यायची होती पण काही कारणास्तव विसरलो तर तुला राग आला .....तू म्हणालीस मी आता कधीच येणार नाही ...तू कधी नाराज होशील याचा नेम नसतो .....आणि फुलांचा मोसम नसताना मला फुले मिळतात ..हे तुला माहित असावे ...मला आता लवकर निघायला हवे परतीच्या प्रवासाला ....कोणताही प्रवास एकाकी आणि एकलेपनातून होतो ...तू ..फुलं...मी ...प्रवास ...एकाकी ...एकले ..सारेच शापित आणि खूप दुखदायक.

punha patra By Rajendra Banait · Wednesday, 28 July 2010


फेसबुकच्या सर्व मित्रांना मानाप्रमाणे नमस्कार .वि. वि .
तुमच्या पत्राचे उत्तर मिळाल्याने लगेच पत्र लिहायला घेतले ..आताशा पत्र लिहिताना हात थरथरतात ...... चहाची बशी देखील थरथरते .आपण सगळी फेस्बुक्मुळे खुशाल आसल्याचे कळले आणि आनंद वाटला ....पूर्वी गल्लीत पोस्टमन आला कि सासुरवाशिणी त्याच्याशी डोळ्यानेच बोलायच्या .... किती धाकात होत्या सुना लेकी ..... आता कुरीअर्वाला येतो .....भावना आटल्या आहेत .पत्रच लिहावेसे वाटात नाही ..सर्वच महाग झाले आहे ..भावना पोहचायला किती वेळ लागतो ..आजच्या काळात संवादाची इतकी माध्यमे आसताना .....बरे ते जाऊ द्या ... असेच पत्रुतर करावे .,हि विनंती ..बाकी क्षेमकुशल ...ठेवतो लेखणी हाताला कळ आली आणि काळजात देखील
सर्वांनी काळजी घ्या ....
ता. क . ;- पाऊस जोरात पडतोय ..... सर्दी होईल आसे वागू नका
आपला ..चेहरापुस्तक मित्र ..राजेंद्र

बालपणीचा खेळ ..कब्रस्तान By Rajendra Banait · Wednesday, 28 July 2010


मी नगरला इयत्ता ३रित असताना ची गोष्ट आहे .... मी शालेच्याजवळ असलेल्या क्रिस्ती स्मशानभूमीत जात असायचो .... लाकड्याच्या पेटीत मृतदेह आणून तो पुरण्याचा .....आणि प्रार्थना म्हणयचा कार्यक्रम कित्येकवेळा मी पहिला ...माझे मनाला ते थोडेसे कळत होते ..काही दिवसांनी मी घरी आल्यावर मला जर खेळातून कोणी हाकलून दिले कि , मी मुंगळे मारायचो आणि त्यांना काडेपेटीत टाकायचो आणि जमिनीत पुरायचो .....त्यावर कुल्फिच्या काडीचा क्रूस तयार करून जमिनीत पुरायचो ....अश्या दहा -पंधरा काडेपेट्या जमिनीत पुरून मी माझी स्मशानभूमी तयार करायचो ......थोडे लांब अंतरावर जाऊन हि स्मशानभूमी पाहत राहायचो .....आणि का कुणास ठाऊक खूप रडायचो ..........नन्तर खेल विस्कुटून टाकायचो ......या कृतीचा अर्थ मला थोडा थोडा लागला आहे ....आपल्यापैकी कोणाला लागला तर प्रतिक्रिया जरूर कळवा

रात्र आणि दिवस आणि आपण By Rajendra Banait · Friday, 06 August 2010


काय असेल यापुढील जीवन .... रात्रीचा बोगदा संपला आहे ......दिवसाचा मोठा घाट दुस्तर आहे .......वाटा जर रोज आवघड होत आसतील तर आपला काय दोष ?आणि प्राप्त परिस्थितीशी लढायचे तरी किती दिवस ......स्वताला प्लेस किती दिवस करणार फेसबुकवर ....? आणि त्यातला क्षणभंगुर आनदाने काय मिळवले तर हाती आले शून्य .......आणि नेटचे मोठे बिल ......हि आपली रगआहे का ..? का आहान्कार..?कि मनाचे भ्रर्मक खेळ .......हि तहान आहे का ? कि संवादाची भूक .......स्वताला आजमावून बघणे आणि दुसर्याला आजमावून बघणे बंद केले पाहिजे ......मौनात गेले पाहिजे ....

मधेच तिचे अवखळ हसणे by Rajendra Banait on Saturday, 14 August 2010 at 02:36


हा नवा खेळ संवादाचा ..........हा पुन्हा पोरखेळ बेजबाबदार जगण्याचा .................हा फेसबुकवर बसण्याचा छंद कॉलेजकॅन्टीन मध्ये पडीक राहण्यासारखा......................जीवनाचे कित्येक तास बंक करून गप्पा मारण्याचा .................हा थोडासा दुबळा पळपुटेपणा........................जीवनापासून पळण्याचा...........थोड्याश्या कुचाळक्या................... थोड्याशा लायनी मारण्याचे कार्यक्रम .......................थोडेसे वाट पाहणे ...................थोडेसे स्वतालाच सावरून बसने ...आणि उसने अवसान आणून एक कविता लिहिणे .....................मैफिल रंगात आलीय ......................आता इतक्यात सोडून जाता कसे येईल .......................बघ ती कशी अवखळ हसलीय ........................................................मधेच ..!

बालपणीचा १५ ऑगस्ट By Rajendra Banait · Sunday, 15 August 2010


बालपणीचा १५ ऑगस्ट.........:----        १५ आगस्त म्हटला कि ,मला पहिले आठवते ५ पैशाचा पांढरा खडू आणायचा ..तो कापडी बुटाला रगडून लावायचा .....एखादी लेसची बाजू नेहमीप्रमाणे मातकट रहायची ...एका डोळ्यात चिपाड राहाय्लेले ... पीटीचे सर घाई घाई ने रांगा लावायचे ...मोठ्या करण्या वरती जाड्या भरड्या आवाजात राष्ट्गीत व्हायचे .... दोन पारलेचेबिस्किटे मिळायची ..किंवा भेळीचा बारका पुडा ... तो खाता -खाता घरी जायचे ...तांब्यांनी केलीली इस्त्री केव्हाच मोडून गेलेली .... पाढरे बूट केव्हाच घाण झालेले .....वेग-वेगळ्या गल्यातून टाइमपास करत घरी येऊन मस्त झोपणे .......
झोपेतून उठल्यावर दूरदर्शनवर कुठला तरी राष्ट्र भक्तीपर सिनेमा कृष्ण-धवल रंगात बघायचा ... थोडासा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करायचा ....पण एक त्यावेळी कळले नाही ....स्वतंत्र म्हणजे काय ..? युद्ध म्हणजे काय ..? भारत -पाकिस्तान वेगळे कशासाठी झाले ..?

कविता महाजन :-म्हणजे बालपणीच्या मराठीच्या बाई.......!!!! By Rajendra Banait · Thursday, 19 August 2010


परवा कविता महाजन यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आला ..थोडी धाक-धुक ...पण ५ मिनिटाने सारे काही सुरळीत ..मनात म्हटलो ..अरे ,या तर आपल्या मराठीच्या बाई वाटतात ...कोणताही अभिविनेश नाही ..साधे -सरळ बोलणे ...मधूनच गूढ हसणे .....एखाद्या सर्वद्न्य योग्यासारखे ....इतकी पुस्तके लिहिली पण थोडा देखील गर्व नाही ..मुख्य म्हणजे माज नाही .., वर्गातल्या मुलांना प्रेमाने समजून सांगण्यासारखा स्वर आणि मधूनच थोडासा करारीपणा -कडकपणा देखील ....बरीच लेखक -कवी आजपर्यंत अनुभवलीत ..काहीच रोख -ठोक ....त्यातीलच एक म्हणजे ..कविता महाजन ..! फार चांगल्या गोष्टी सांगितल्या ..आणि योग्य सूचना देखील ....,, मधेच घरातील लोकाची विचारपूस .....कोणताही अहंकार नाही ..स्वरात काहीसा पोक्त पणा...आवाजात मधूनच एक प्रकारचा प्रवाही आवेग ..,त्यांना काय सांगायेचेय ते आपण नीट कान देऊन ऐकायचे ..,बालपणच्या मराठीच्या बाई अश्याच होत्या ...!मला एक -दोन शंका होत्या ..त्याची सरळ उत्तरे त्यांनी दिली ...आणि त्याच्या वालवर मी तीनदा जरा जास्तीचे लिहिले होते ..त्याबद्दल मी खंत व्यक्त केली ..पण यांनी ते फार मोठ्या दिलदारीने समजून घेतले ..आणि एखाद्या नवख्या मुलाला तुझी चूक झालीच नाही असे दाखवले ...असा मोठेपणा त्यांच्याकडे फार आहे .....आणि यावर पाघरून टाकायचे कसे ..? तर मधेच गूढ --आणि ...समजूतदार हसणे ..फार कमी जणांना जमते हे ...!काही लेखकांची नावे सांगितली ..तुम्ही ह्यांना वाचाच ..वैगेरे ..! तुम्ही ठाण्याला या असे निमंत्रण ...!मी मुबईला घाबरतो आसे म्हटल्यावर परत गूढ हसल्या ... बरे मी तुम्हाला पुण्यात आल्यावर भेटेल अश्या म्हणाल्या ..! दुख कसे पचवावे ..किंवा त्यावर मात कशी करावी .यावर काही टिप्स दिल्या ..!!.कोण आहे आजच्या जमान्यात तुम्हाला एकूण घेणारा ..??? माझी फेस्बुक्वरची मानलेली बहिण ,,(साक्खीसारखी वाटणारी ) अनुसया वाडेकर (दीदी ) हिच्याविषयी मी चवकशी केली ..त्यावर पुन्हा पोक्त हसून मला तिच्याविषयी सांगितले ....!!!आणि मग आम्ही संवाद थांबवला ...जवळ -जवळ एक तास आम्ही बोलत होतो ...माझे १९९१ पासूनचे त्यांच्याशी बोलण्याचे स्वप्न साकार झाले ......आणि व्यक्तिगत जीवनात परत एकदा बालपणीच्या मराठीच्या बाई परत काही बाबी समजून सांगण्यासाठी देवाने पाठवल्या .......!!!!!!

वसईचा सिद्धार्थ तांबे आणि नारायण सुर्वे :- एक आठवण By Rajendra Banait · Sunday, 22 August 2010


मला एका मराठीच्या प्रधापाकाचा फोन आला ..,अरे बानाईत तांबे गेला ....त्या आगोदर मी तीन महिन्यापूर्वी बोललो होतो ...तेही १५ वर्षानंतर ...त्याचा किरता आवाज बोल राजू काय म्हणतोय .., आरे अंगावरून वारे गेलेय माझ्या चालता येत नाही .., कसातरी जगतो आहे ...मी त्याला म्हणालो मागील काही दिवसात मी भविष्य पाहतो आहे ...तू तुझी जन्मतारीख सांग....त्याने ती सांगितली ..,मी म्हणालो अभ्यास करून काहीतरी झाडपाल्याचा तोडगा सुचवतो ..,तो म्हणाला ,कायकायाचे ते कर आणि वसईला येऊन जा ....!!!मी अभ्यास केला नाही (नेहमी प्रमाणे आळस)काही दिवसांनी २ च महिन्यांनी कळले तांबे गेला ....फार वाईट वाटले ....आयुष्यात सर्वात प्रथम मला कविसंमेलनाची सूत्रे हाती देणारा तो माझा पहिलाच मित्र .....अध्यक्ष पद भूषवत होते ...नारायण सुर्वे ....मी घाबरलो ..आरे तांबे गडबड उडाली तर ....तो म्हणाला राजू तुझ्या ठेवणीतल्या कविता काढायच्या आशय वेळेला ......कशीतरी सुरवात केली ...संमेलन अर्ध्यावरती आलेले ...सुर्वे मास्तरांची चुलबुल चालू होती ....आणि अचानक तडक मास्तर बाहेर निघाले ....तांबे घाबरला ...तो त्यांना गेला शोधायला .....माझी पक्की फाटलेली .१०-१२ कवी कविता वाचून झाले ....मी म्हणालो सुर्वे मास्तर गेले .....(लोकांनी आगोदर घाबरून बघितले आणि त्याच वेळाला तांबे धावत आला ..खुणांनी सांगितले मास्तर सु -सु करायला गेले होते .....प्रेक्षकातून हसण्याच्या लाटा येत होत्या)मास्तर पाठीमागून आले आणि खड्या आवाजात म्हणाले ..काही -नाही पावसाळ्याच्या दिवसात येतेच दाटून ...! लोक परत हसले .....मी काही गेलो नव्हतोय......तर ते जाऊ द्या आता आलो आहे तर ४-५ कविता म्हणूनच जाणार ...........त्यातली सर कर एक एक गड मला काही प्रमाणात पाठ होती तिची थोडीफार नक्कल करत माईक मास्तरांच्या हाती सोपवला ......मग काय म्हणता सर्वांनी सोबत गायचेच असा मास्तरांचा हट्ट त्यामुळे एख्याद्या रॉक कार्यक्रमाचा फील येत होता ......सगळे त्यांच्या कवितेत,,, स्वरात,,,, तन्मयतेने तादात्म पावले होते ...... आता नारायण सुर्वे पण नाहीत आणि वसईचा बोकड दाढी ठेवणारा अशक्त सिद्धार्थ तांबे पण नाही ............!!!!!!

कोण कोणाला कसे रिसीव्ह करते!!!!!!!! By Rajendra Banait · Wednesday, 01 September 2010


तुझ्यासाठी मी सारे काही करील ...मी तुझ्यासाठी जग सोडेल ....मी तुला शेवट परन्त साथ देईल ...मी माझे सात जन्म तुझ्यासाठी देईल ....आशी वाक्ये कोणी म्हणाली  तर समजायचे मडके  कच्चे आहे ......जे आपसूकपणे मागे येत राहील ...जे  दोन झाडाच्या सारखे बुध्यापासून चिकटून वाढतील ती मडक्की भाजलेली  आहेत ....रोम्यातिक बोलणारे भरपूर आहेत ...पण जीवनाची  जाण आणि वास्तवता  किती जणाकडे आहे ..?   आणि असली तर त्याचा उपयोग  किती करतात ..?कोण कोणाला काय देते यापेक्षा कोण कोणाला कसे  रिसीव्ह करते शेवट पर्यंत  ....ते महत्वचे ..!

.धुक्यातला ..काळापर्वत ... लालन सारंग ..!!!!!!!! By Rajendra Banait · Tuesday, 07 September 2010


लालन सारंग ...मला लहानपणीपासून त्या आवडायच्या .......त्याच्या काही सिरियल्स पहिल्या ...पण नाटके पाहता आली नाही ...भारदस्त बेसचा आवाज ...औंधला फोटो-फास्टच्या  दुकानात मी शिरलो तर ..तलम काळ्या साडीतल्या भुवया प्लकर केल्रल्या लालनताई दिसल्या ....मी त्यांना विचारले तुम्ही ,..लालन सारंग का ? त्या हो म्हणाल्या ...! मी त्यांना म्हटले ..मी तुमचा लहानपणापासूनचा चाहता आहे ...एक विचारु का? एन्कीच्या राज्यातला  विलास सारंग तुमचा कोण ? त्यावर त्या म्हणाल्या   आडनाव बंधू ,,! त्याचे करारी पाहणे ....रझा मुराद सारखा बेसचा आवाज ....काळी साडी ...स्पष्ट उच्चार ...मंद हसणे फक्त ओठात ....! फार कमी स्त्रिया अश्या असतात  
कमलाकर सारंगच्या मृत्यू नन्तर त्या पुण्याला आल्या ...औंध मध्ये त्या राहतात ...मी पुण्याला जायला निघालो कि त्या मला दिसतात ...कधी कधी ! फार बरे वाटते त्यांच्याकडे बघितल्यावर .....नेहमीच त्या एकट्या  असतात ....उठून दिसतात ..!  त्याच्याकडे बघून नेहमी वाटते ,,यांच्याशी खूप बोलावे ...पण  एक प्रकारची अनाम रेषा त्याच्या देहबोलीतून होते ...मग बोलण्याचं धाडस कमी होत जाते ..धुक्यातला ..काळापर्वत  कसा आसतो  तश्या त्या  माझ्या नजरेतून  लांबच -लांब निघून जातात ..........................................................खूप  वाईट वाटते अशी माणसे आपल्या जीवनात  नाही म्हणून ...!!!!!!!!!!!

साडीचा वास ....................... By Rajendra Banait · Saturday, 06 November 2010


स्त्रीयांना  साड्या खूप आवडतात ...नवीन साड्यांना ,जुन्या साड्यांना स्वताचा एक वास आसतो ..आणि तो वास अनेक आठवणीत घेऊन जातो ..रंगभूमीचे मोठे कलाकार  काशिनाथ घाणेकर हे तर आई वारल्यावर  आईची आठवण आली कि मोठ्या पेटीतून आईच्या साड्या काढून त्याला आवळून झोपायचे ..आजीचा साडीचा वास .,आईच्या साडीचा वास .,बहिणीच्या साडीचा वास .,बायकोच्या साडीचा वास ...अश्या कित्येक स्त्रीयाच्या साड्याचे वास माणसाला जुन्या भूतकाळात घेऊन जातात ..
<span>या वासामध्ये काही अत्तराचा वास ..,सारवलेल्या शेणाचा वास .,स्वताच्या शरीराचा वास .,जिथे राहतो तिथल्या वातावरणाचा वास  ....आसे सर्व वास एकत्र होऊन एक गंध त्या साडीला   ..,त्या स्त्रीला चिकटून आसतो ..काही वासामुळे काही चित्रे .,प्रसंग .,आठवणी ..,डोळ्यासमोर  दाटून येतात ...आणि  गंधाबरोबर माणूस त्या आठवणीत हरावून जातो ...
मी जेव्हा साड्या खरेदीला जातो तेव्हा ..अनेक प्रकारच्या ..पोताच्या साड्या खुणावत असतात ..काही रंग .,काही चित्रे ..,काही डिझाईन .,काही इम्ब्राडरीस,,. गोंडे ..,जोर्जेट..,इरकली /.सिल्क / सिफोय्न /बटर सिल्क  /रेशमी /सुती /चुनडी /किती प्रकार असतील ते चोखानदल स्त्रीला माहित आसतील ..परत त्या धुवायच्या कश्या ......इस्त्री करायची का नाही ....बर्याच गंमती ......
मी पुरुष असून जेव्हा साडी खरेदीला जातो ना तेव्हा मी पण हरखून जातो ....गेली १५ वर्ष्ये मी साड्या खरेदी करतो ..पण मला कधीही कंटाळा आला नाही ...पण बायाकासारखा मी जास्त वेळ लावत नाही ...साडी घेणे म्हणजे एक मस्त मजा आसते ....आणि एखाद्या  चित्राच्या  प्रदर्शनाला जातो  ना तसा फील आणि आनंद  मला साडी घेताना येतो ......मी माझ्या बायकोला ..,बहिणीला ..,आईला ..,वाहिनीला  जेव्हा साड्या आणतो ना  तेव्हा  एक बहिण सोडल्यास  माझ्या साड्याचे बर्यापैकी कौतुक होते ......कधी -कधी बदलण्याचे प्रसंग पण येतात ....
पण आमच्या घरातील स्त्रिया चलाख ....त्या म्हणतात  राहू द्या आता ...परत नन्तर आणायच्या आहेत कि तेव्हा  आम्हीपण येऊ...म्हणजे काय  परत त्यांच्या मन -पसंतीच्या  साड्या  घेण्यासाठी जावे लागतेच ................................................................................आणि मलाही ते आवडते ..
</span>


साडीचा वास ....................... By Rajendra Banait · Saturday, 06 November 2010


स्त्रीयांना  साड्या खूप आवडतात ...नवीन साड्यांना ,जुन्या साड्यांना स्वताचा एक वास आसतो ..आणि तो वास अनेक आठवणीत घेऊन जातो ..रंगभूमीचे मोठे कलाकार  काशिनाथ घाणेकर हे तर आई वारल्यावर  आईची आठवण आली कि मोठ्या पेटीतून आईच्या साड्या काढून त्याला आवळून झोपायचे ..आजीचा साडीचा वास .,आईच्या साडीचा वास .,बहिणीच्या साडीचा वास .,बायकोच्या साडीचा वास ...अश्या कित्येक स्त्रीयाच्या साड्याचे वास माणसाला जुन्या भूतकाळात घेऊन जातात ..
<span>या वासामध्ये काही अत्तराचा वास ..,सारवलेल्या शेणाचा वास .,स्वताच्या शरीराचा वास .,जिथे राहतो तिथल्या वातावरणाचा वास  ....आसे सर्व वास एकत्र होऊन एक गंध त्या साडीला   ..,त्या स्त्रीला चिकटून आसतो ..काही वासामुळे काही चित्रे .,प्रसंग .,आठवणी ..,डोळ्यासमोर  दाटून येतात ...आणि  गंधाबरोबर माणूस त्या आठवणीत हरावून जातो ...
मी जेव्हा साड्या खरेदीला जातो तेव्हा ..अनेक प्रकारच्या ..पोताच्या साड्या खुणावत असतात ..काही रंग .,काही चित्रे ..,काही डिझाईन .,काही इम्ब्राडरीस,,. गोंडे ..,जोर्जेट..,इरकली /.सिल्क / सिफोय्न /बटर सिल्क  /रेशमी /सुती /चुनडी /किती प्रकार असतील ते चोखानदल स्त्रीला माहित आसतील ..परत त्या धुवायच्या कश्या ......इस्त्री करायची का नाही ....बर्याच गंमती ......
मी पुरुष असून जेव्हा साडी खरेदीला जातो ना तेव्हा मी पण हरखून जातो ....गेली १५ वर्ष्ये मी साड्या खरेदी करतो ..पण मला कधीही कंटाळा आला नाही ...पण बायाकासारखा मी जास्त वेळ लावत नाही ...साडी घेणे म्हणजे एक मस्त मजा आसते ....आणि एखाद्या  चित्राच्या  प्रदर्शनाला जातो  ना तसा फील आणि आनंद  मला साडी घेताना येतो ......मी माझ्या बायकोला ..,बहिणीला ..,आईला ..,वाहिनीला  जेव्हा साड्या आणतो ना  तेव्हा  एक बहिण सोडल्यास  माझ्या साड्याचे बर्यापैकी कौतुक होते ......कधी -कधी बदलण्याचे प्रसंग पण येतात ....
पण आमच्या घरातील स्त्रिया चलाख ....त्या म्हणतात  राहू द्या आता ...परत नन्तर आणायच्या आहेत कि तेव्हा  आम्हीपण येऊ...म्हणजे काय  परत त्यांच्या मन -पसंतीच्या  साड्या  घेण्यासाठी जावे लागतेच ................................................................................आणि मलाही ते आवडते ..
</span>


पंख नसलेली परी


  1. पहाटेचे चार वाजलेत ...परी डोळ्यात स्वप्न आणि सत्य घेऊन उठते ....स्वताचे आवरते ...घरातले आवरते ....सकाळी थंडीमध्ये स्टेशन वर साडेसहाला हजर....लोकलचं गार धूड ...परी स्वताचा डबा शोधते
    ..चाके फास्ट होतात ..लोकल च्या गतीतून जीवनाच्या गतीला अधिकच वेग येतो ...स्वप्नातून सत्यात ....आणि सत्यातून स्वप्नात असा दुहेरी खेळ परी खेळत असते .....सोबतीच्या आया..बायांना चीअर अप करत परीचे संवाद चालू होतात ...अनेक घटकांशी ...जसे कि एका टीवीत १०० च्यानेल दिसतात ........................................................

    ........हसणे -खिदळणे - रडणे ...घरातले प्रश्न ते थेट भारताच्या प्रश्नावर परी बोलत असते ......मनात येते केव्हा झाला असेल तिचा अभ्यास आणि कोणी शिकवले असेल तिला ...... पंचवीस वर्ष्ये नोकरी करून स्वताचे पंख तुटत असताना जिने स्वताला पहिले .....आणि जटायू सारखे परोपकार करत जिचे जीवन आजूनही गतिमान आहे .....लोकलच्या अनेक चाकांना जसा हळूहळू ब्रेक बसतो .....तसे \तसे तिचे सर्व विचार हळू -हळू थांबतात .....आणि हळूच ती स्वतामध्ये एक गिरकी घेऊन लोकलच्या बाहेर पडते ....

    .......बाई तुम्ही रोज कश्या हो इतक्या लवकर येता ...ऑफिस-बॉय चा प्रश्न .......परी काहीच बोलत नाही ....उलट त्याला विचारते ..तुझी बायको कशी आहे .....तू मुलाला काल दवाखान्यात घेऊन गेला होता कि नव्हता ......मग टेबलावरच्या देवाला नमस्कार करून कामाला सुरवात करते ........सारे तिच्या ताकदीवर ...,बुद्धीवर जळतात .......अगदी साहेब देखील .........

    मग काम करता -करता ती आपल्या सर्व आवडीच्या लोकाचे प्रोब्लेम सोडवत बसते .......कधी -कधी मधेच रेडिओच्या गाण्यात आपले छान सूर जुळवून टाकते .......कामाचा डोंगर उपसून टाकते ......मग आळोखे -पिळोखे देवून म्हणते ......अरे अनिल ...चहा दे जरा .....आवडीचा चहा पित.....त्याच्याशी गप्पा मारते ........

    ..........................................ऑफिस संपते .......मग पुन्हा घराकडे जाताना घरातले काय हवे -काय नको ते घेत -घेत ....घर गाठते .....

    परी घरात आली ना मग .....एक साधी बाई होते .......आणि मग पुन्हा घरातील कामे ....घरातील नेहमीचे रुटीन ......

    परीला झोपायला रात्रीचे एक -दोन होतात ........कोणाच्या स्वप्नात जाण्याची वेळ टळून गेलेली असते ......परी पोटाशी पाय दुमडून कुक्कुल्या बाळासारखी झोपी जाते ......

    ......तुटके पंख अधिकच तुटत चालेलेत ..पण परी घाबरत नाही .....परी तशीच उडत असते ......रोजच ..........

ती येते आणिक जाते ....................... by Rajendra Banait on Tuesday, 18 January 2011 at 14:30


मला तुझी स्वतंत्रता मान्य आहे ...पर्स तुझ्या नोकरीचे आणि आत्मविश्वासाचे प्रतिक आहे ..मला तुझ्याशी खूप बोलायचे असते ...पण बोलता येत नाही ,,,माझे ऐकण्या साठी तुझ्याकडे वेळ नसतो ....मला वाटते ..तू कशात सतत बिझी असते ...तू का गाणे गुणगुणत येतेस ......म्हणजे याचा अर्थ तू खुश असतेस ...मग मी अडवल्यावर तुझ्या €डोळ्यात अनोळखी भाव का येतात ...तू रागाने का बोलतीस ...तू माझ्या प्रश्नाची नीट उत्तरे का देत नाहीस .....तुला माझा कंटाळा आला आहे का ? ....म्हणून तू मला टाळतेस का ? माणसे पण शिळी होतात का ?......ती स्वताचे गाणे ऐकत निघून जाते .....म्हणजे ती तिची प्रायवसी जपते ...तिचा मूड सांभाळते .....पण ...तो तर तुझ्या खर्या उत्तराच्या प्रतिक्षेत उभा असतो ...काय करावे त्याने ......आणि मुख्य म्हणजे त्याचे हरवले गाणे सापडून देण्यासाठी तू कशाला प्रयत्न केलेस ....त्याला वाटले हि आपल्याला गाणे सापडून देईल ......पण तुलाही ते सापडता आले नाही म्हणून तू निघून गेलेस ........
...................................येताना कधी कळ्या आणिते ......जाताना फुले मागते ................ती येते आणिका जाते ..................................लांब जाते .......................................................

चिमणी आणि ती ............. by Rajendra Banait on Saturday, 22 January 2011 at 00:37


ती भेटली बर्याच दिवसांनी ....घाईत आहे मी  बोल पटकन ....मी  म्हणालो काही बोलायचेय .....मग बोल ना.......मी आता नवीन घर घेतले  आहे ...कर्ज काढून ..१० -१२ वर्ष्ये  लागतील  कर्ज फेडायला ....बर  मग ....ती बरीच घाईत दिसते  आहे  म्हणून  मी म्हणालो .....काही  नाही वास्तुशांतीच्या  वेळी  तुझी  आठवण आली  होती ...तुझ्या  आवडीच्या  कोथांबिरीच्या  वड्या केल्या   होत्या ......माझ्या  मुलाला  ओरडून  सांगितले  अरे  चिमणीला  खाऊ  घातली  का ...?   बायकोला  कळले ..ती कसनुसे हसली .....तू मला नेहमी म्हणायची ...मी जरी तुझ्या आयुष्यात  नसले   तरी   तू  आठवणीने  आवडीच्या खाण्याच्या  वेळी  तू आठवणीने  तू एक घास  चिमणीला खाऊ घालत  जा ....म्हणजे   तो  घास  मला पोहचेल ......गेली १२ -१३ वर्ष्ये मी हे पाळतो  बरे का  ..मी  तिला   हे सर्व सांगितल्यावर ....ती गोड हसली ..नजर  बदलून  म्हणाली ...तू  असाच  वेडा  राहणार  कसे  होणार  रे तुझे  काही कळत नाही ?  काही पैसे लागले  तर सांग बरे का ..लाजू  नको  हं...........
..............................................मी मनात म्हणालो .......तू असती तर घराच्या  अंगणात  खूप  चिमण्या  आल्या असत्या .....आपण  मिळून त्यांना   दाणे  टाकले  असते .....आज सारेच बदलले आहे ......ती म्हणाली ..निघते  रे ......फार  उशीर झालाय  ....माझा नवरा ..मुले   वाट पाहत  असतील .....जाते  मी ....ती डोळ्यात डोळे  न घालता चिमणीसारखी  भुर्र उडून  गेली ......................मी तसाच कोरडा  उभा खाली हाताने............................................... रिकाम्या  मनाने......
....................कानात ...डोक्यात फक्त भुर्र उडल्याचा पंखांचा आवाज ...................कितीतरी वेळ...... 



...........................तुम्हे कोई ओर देखे तो जलता है दिल by Rajendra Banait on Monday, 24 January 2011 at 22:16


हायस्कूल चे दिवस ......सिनेमा गाजत होता ...कुदरत ...राजेश ...हेमा ...सुप्रसिद्ध गाणे ..हमे तुमसे प्यार कितना .....किशोरकुमार ....बेगम परवीन सुलताना .......दोघाच्या आवाजातले .......हे गाणे वाटले नव्हते आयुष्यभर  पुरून उरेल ...दहावी पर्यंत हे गाणे मुखोद्गत झालेले ....गाणे कुठूनही ऐकू आले ...कि  डोळ्यात पाणी आपसूक येणार ......काही काळ निघून गेला ...कॉलेज चे दिवस सुरु झाले .......
.........या गाण्याने आपले खरे रूप दाखवण्यास सुरवात केली ......एकतर्फी  प्रेमात पडण्याची  साथ साधारणत ऑगस्ट ...सप्टेबरला  चालू होते ....आमची बरीच्ग मित्र -मडळी या आजाराने ग्रासली ....काही मुलीच्या प्रेमात  तर ५ -५ ../६ -६  मित्र पडल्याचे laksaht  येत  होते ...
मी तरी यातून कसा सुटणार ......गाणे  तर पाठ झालेले .......जराश्या बुद्धिमान  आणि गोड किनर्या आवाजाच्या एका मुलीच्या प्रेमात मी पडलो .....साथ जोरदार असल्याने .....उपाय  म्हणून  अजागळ राहणे ....सिगारेटी पिणे ....रेक्टर नसेल तर मित्रंच्या  खोलीत दारूकाम करणे ...मैफिली भरवणे .....रडक्या गझला ...रडकी मुकेश ..रफी ....किशोरची  गाणी दारू पीत म्हणत राहणे .....मग मुलीवर चर्चा सुरु ......कोण ...कोणाला लाईन देते ...कोण कोणाच्या जवळ राहते ...कोणाचा  भाऊ गुंड आहे ...कोणाचे  वडील पोलीस आहेत ......जाम चर्चा रगयाच्या......मग कोणीतरी अचानक रडायला सुरुवात  करायचे .......ती नाही म्हणाली   रे ....हा  रे इतका लाम्बयाचा  कि वाटायचे  ह्याची  आई   वारली  कि काय ......मग त्याची समजूत काढणे  सुरु व्हायचे ............मग परत €दारू  आणायला सांगणे ....चिल्लर जमा करणे ...हातातले घड्याळ  विकणे ...फीचे  पैसे खर्च करणे ....असे करून दारू पीत पीत ....आठवणीच्या  महापुरात   वाहत  जाने ....एखादा   काठावरचा  हळूच म्हणायचं .....
...........................तुम्हे कोई ओर देखे तो जलता है दिल  
......हे असे आठवडाभर किंवा महिना -महिना   चालायचे .....काहींचा रोग आपोआप बारा व्हायचा ...कोणाचा मार खाऊन...कोणाचा माघार घेऊन ....कोणाचा  होकार  मिळाल्यामुळे ......आणि माझ्यासारख्या  बर्याच जनाचा  हा रोग अंगात  मुरायाचा .........................काही जोड्या मग फिरताना €दिसायच्या ....मग आत -आत तडफड.....मग  परवीन सुलताना याचा मोठा -थोरला आलाप पोटातून ...ओठातून ...सद्गदित आवाजात निघायाचा  .....हमे तुमसे प्यार कितना ................................
मी माझ्या आयुष्यात किती तरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडलो  होतो ......अजूनही   काही  मुली  आता दोन लेकराच्या बाया  ....कधीतरी त्यांच्या नवर्या बरोबर   दिसतात ..............मग जुन्या  जखमा  पुन्हा ओल्या  होतात .....आणि   आतला  किशोरकुमार  भर  रस्त्यावर  गाऊ   लागतो ....................
तुम्हे  कोई और देखे  तो जलता है दिल ..बडी  मुश्कीलोन्से फिर गुजरता है दिल .....क्या क्या जतन करते है ....तुम्हे क्या पता...

भालचंद्र नेमाडे यांची पदमश्री .....---- एक दंतकथा by Rajendra Banait on Thursday, 27 January 2011 at 22:59


फार पूर्वीची गोष्ट आहे ....कोसालाकार  भालचंद्र नेमाडे   साहित्यिक वर्तुळात बुद्धिमान म्हणून प्रसिद्ध होते ....त्यावेळी  पु .ल....आरती प्रभू ....कुसुमाग्रज ...असे सगळे काहीना काही भारी लिहित होते ....काही लिटील म्यागेझीन काढत बसले होते ...तर काही मौजचे लेखक म्हणून मिरवत होते .....दलित..ग्रामीण ...असे  वाद उफाळत होतेच .....तेव्हा  पांडुरंग सांगवीकर म्हणाला ....आता  माझ्या लेखणीने समाज बदलायाचा प्रयत्न करतो .....इकडे पारू सावनुर ग्रेसचे चर्चबेल वाचण्यात मग्न होती ....ती  ते वाचत असताना ....देशी  साहित्य ...असा  गांधीवादी जोर पांडुरंगाने लावला ......अनेकांवर देखणी टीका करायचे स्वयंवर त्याने करायचे ठरवले ....काही झाले का देशी ......असा  हा देशी पांडुरंग मुंबईत अवतरला ....
अनेकांना  तो  उद्धट वाटत होता ....पण आपल्या खानदेशी पाण्याचा जोर त्याने असा काय लावला .....कि बरेच लेखक हा आला कि पळून जायचे .......आरती प्रभू या भोळ्या कवीला -लेखकाला ..काळा घोडा परिसरात असे काही भोसाडले कि ...आरती प्रभू गप्पं होऊन चालू लागले ....तर मागून पांडुरंग  म्हणतो ...वास्त्ववता हवी ...पैसे कमवायला  हवे .....मराठी साहित्य भराला आलेला तो काळ ........
................पण साहित्यात खूप राजकारण होते ...ग्रुप  होते ....फार कमी लोकांचे कौतुक  व्हायचे ......पुरस्कार   मिळणे  म्हणजे  फार मोठी गोष्ट .....तिथेही लॉबिंग ....
मराठीत साहित्यिकांना पुरस्कार केव्हा  मिळत  तर  ते म्हातारे झाल्यावर ......,त्यांच्या लेखनाचे कौतुक केव्हा होत  तर   ते मेल्यावर .......हे   वास्तव  लक्षात आल्यावर  पांडुरंगाने गढवाली भाषा शिकण्याचा  प्रयत्न  केला .....देशी  साहित्य कुठे  आहे तर ...भारतातल्या  खेड्यांमध्ये ....रा . भी . जोशी सारखी मजल-दरमजल  करत पांडुरंग काही ट्रिक्स शिकून हिमाचल प्रदेशात बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत  राहिला ......त्याला  महाराश्र्ताची आठवण  यायची  ती पत्रे आल्यावर  मग तो देशी संताप व्यक्त करत असे ....
पांडुरंगाला  म्हणावे तसे कौतुक न झाल्यामुळे  तो आतल्या आत खंतावला  होता ......मराठीतील अनेक मंडळीनी त्याचा योग्य सत्कार न केल्याने  त्याला फार अतीव दुख झाले .....मग त्याने हिंदू हि आपली  जुनी  जाहीर  केलेली  कादंबरी  लिहिण्यास  सुरवात  केली ...बर्याच दिवसांनी हि कादम्बरी   प्रकाशित झाली ....
गढवाली लोकांनी खूप मोठा सन्मान केला ......हिमाचल प्रदेशात  अनेक राजकारणी ...समाजकारणी ...साहित्यिकांनी  पांडुरंगाचे  नाव  भारत सरकारला  कळवले .....कोणतीही ग्रुप्बाजी आणि कोणताही जातीभेद न व्होता ...त्याचे नाव पद्मश्री पुरस्काराला  सुचवण्यात आले .......
मोठ्या भिंगाच्या चष्म्यातून पांडुरंग आसवे टिपू लागला ....मनात  म्हणाला ......हे जर महाराष्ट्र  सरकारने केले असते  तर ? लेखकाला  त्याच्या मातीतून  दाद मिळाली असती  तर ......हाच  पुरस्कार आपण मराठी  माणसाला ..मराठी साहित्यिकांना ....सर्व  देशी  जाणीव  ठेवणाऱ्या  प्रतेक   भूमिपुत्राला   अर्पण  केला असता .....
......................कोणताही निषेध न नोदवता  पांडुरंग सांगवीकरने   हा पुरस्कार  स्वीकारला .......
(हा लेख वाचून जर कोणाला दुख झाले तर मला  माफ करावे  हि नम्र  विनंती ...--------.राजेंद्र  बाणाईत...)

डोहातील जलपरी....... ! by Rajendra Banait on Sunday, 30 January 2011 at 01:28


पुन्हा तू..................... !कसे मनाला सागायचे समजून ? तुझ्या नजरेतून मी अस्तमानाच्या सूर्यासारखा बुडत जाताना मी मला पाहतो ......आणि मी पुन्हा धीर धरून विचारतो ...तुझे माझ्यावर प्रेम आहे..............?.तुझ्या डोळ्यात संधिप्रकाश ....... तुझ्या अल्लड आवाजातून तू पुन्हा मलाच  विचारतेस ......तुला मी झेपवेल का रे  बाबा खरे सांग..... ?  सारे अंधारून येताना मी एखाद्या चुरागलेल्या कागदाच्या बोळ्यासारखा लांबवर उडून जातो ........माझ्या आतल्या वादळात मी हरवून जातो ....आणि ती डोळ्यातील काजळ सारखे करत असते .......माझ्या भेट दिलेल्या हातरुमालाने..................
.
स्वतालाच समजून सांगत आपण आपले झोपायचे .....कळत असल्यापासून ......प्रेमळ सखी आपल्या आयुष्यात असावी हे सर्वाचे स्वप्न ....वास्तवात सखी वेगळी असते ....प्रेमळ  पण  स्वतात हरवलेली ...दूरच्या प्रदेशातील ........ती पंख लाऊन निघून जाते ...आणि  आपण शनी माहात्म्यातील  हात -पाय  तोडलेल्या  राजा विक्रमासारखे  तेलाच्या  ...वास्तवाच्या ...पैसे कमावण्याच्या  घाण्याला  जुंपलेलो ............
मध्ये एकदा तू बोलता -बोलता म्हणालीस ....कविता सोडून तुला काय करता  येते ...?  मी हतबल स्वरात म्हणालो ...काही नाही ....तेव्हा तू पुट -पुटलीस ..काही खरे नाही रे बाबा तुझे ...........कसे होणार रे राजा तुझे ? 
टोपी हरवलेल्या भिकारी राजासारखी माझी स्थिती ......आणि  तू पुन्हा क्षितिजा पर्यंत पोहोचलेली ..........दूर ......फार दूर .....फार दूर  अंधारात विलीन झालेली ....काळ्या जलाच्या  डोहातील जलपरीसारखी .........


पाण्याचा बंब....... -एक आठवण by Rajendra Banait on Sunday, 06 February 2011 at 01:36


परवा तांबट आळीतून चाललो होतो .....पाण्याचा बंब पाहिला आणि जुन्या आठवणीना उजाळा मिळाला ...आमच्या गावाकडे खटल्याचे कुटुंब ...चार -पाच काका ...त्यांची वीस -पंचवीस मुले ..म्हणजे माझी चुलत भांवंडे..गावाकडे जत्रेला गेलो न मग पहाटेच्या बोचर्या थंडीत हुडहुडी अंगात  असताना  माजघरात पोरे कुडकुडत बसलेली असायची ...तांब्याचा पाण्याचा बंब धुमसून पेटलेला असायचा ..बाजूला लाकडांचा  ढीग ,रॉकेलची बाटली .,कोयता ..,गवर्या ...शिंप्याच्या पोत्यातल्या चिंध्या ...असे  वातावरण ...धुके ...त्यात धूर ..त्यात  ओल्या लाकडाच वास ...संपूर्ण घरात धूर...अर्धवट झोपेत डोळ्यात जाणारा धूर ......बम्बातून निघणार्या ज्वाला ....मधेच आग विझली कि आजीचे ओरडणे ..सुनांना फैलावर घेणे कार्यक्रम सुरु व्हायचा ...कामाची वाटणी सुरु व्हायची ....पाण्याचा बंब ...त्याच्या खाली असणारी मुठ असलेली लोखंडी झारी ..तिच्यात विस्तू पडण्यास सुरवात झाली कि ...त्यातला विस्तू घेऊन चूल पेटवल्या जायची .....बंबाला एका बाजूला वरती पितल्याचे झाकण असायचे ..त्याला बिजागरी असायची ...बंबाला पितळी नळ असायचा ....पाणी  काढले कि परत त्यात मोठ्या पितळी घागरीने पाणी ओतणे चालू असायचे ...त्यातले थोडेसे पाणी आगीवर पडायचे ...मग परत धूर ....परत आजीचे किंवा मोठ्या काकूचे ओरडणे ......चुलीतील एका बाजूला चहाचे पाणी उकळत असायचे .....त्या चहाचा आणि  त्या लाकडाच्या धुराचा   वास एक व्हायचा ......
एकेकाच्या अंघोळी संपत येत आल्या कि ...मग कान नसलेल्या कपातून चहा पिणे ...पितळी परातीत चहा पिणे कार्यक्रम चालू असायचा ....आमच्या गावात काहींकडे पितळ्याचा बंब असायचा ...ते घर श्रीमंताचे असायचे .......आता पाण्याचा बंब दिसला कि गावाकडची आठवण येते .....जाडा पितळी नळ असलेला पाण्याचा बंब काही दिवसांनी   संग्रहात पाहिला मिळेल .....
बम्बातील पाण्याला ओल्या लाकडाचा ..थोडास रॉकेलचा वास लागलेला असायचा ...ते पाणी अंगावर घेत ...काही स्तोत्रे जोरात ओरडून आंघोळ करणारे माझे वडील  मला कधी -कधी  म्हणतात ......आता मिळतो  कारे  कुठे पाण्याचा बंब ? 
मी मनात म्हणतो ...बंब मिळेल .....पण लाकडे गोळा करून आणणारे ...गवर्या थापाणारे ...लाईनीत थांबून रॉकेल आणणारे .....कोयत्याने  बरोबर लाकडे  तोडणारे ...आणि  मुख्य  म्हणजे बंब पेटवायची  कला असलेले  हात आता  राहिलेले  नाहीत ...........आणि अंघोळ झाल्यावर लगेचच स्वयंपाकाला लागणाऱ्या  आणि चुलीपुढे धुराने आणि सासूच्या ..मोठ्या दिराच्या  शेलक्या शिवीगाळाने डोळ्यात कढत येणाऱ्या पाण्याला साडीच्या काठाला पुसणाऱ्या आया-बाया आता राहिल्या नाहीत .................................









..........कपाळ ......... by Rajendra Banait on Friday, 18 February 2011 at 15:59


चला उशीर फार झालाय ...मुलीला लवकर आणा..मंगलला दाखवण्याचा कार्यक्रम चालू होता ....मंगल आली माजघरातून बैठकीच्या घरात ....तिला पाहिल्या -पाहिल्या सर्वजन म्हणाले ...मुलीचे कपाळ किती मोठे आहे ...आत्ता पर्यंत असे कुठेच बघायला मिळाले नाही .....मग चर्चा =प्रश्नोतरे सुरु झाली .......................................आणि मंगल भूतकाळात गेली बर्याचवेळ .......लहानपणी तिचे कपाळ पाहून एक जोतिषी म्हणाला  पोरगी थोरमोठाच्या घरात पडणार ....शाळेतील वर्गातील मुली तिच्या कपाळाला हात लाऊन पाह्याच्या ....एकदा एक जोगतीण त्यांच्या घरासमोर आली  तिने हिचे कपाळ पाहून आपल्या कुंकवाने मळवट भरला ...त्यावेळाला मंगल साक्षात देवी दिसत होती ...आजूबाजूच्या सर्व बायका तिच्या पाया पडल्या ......शाळेच्या स्नेह -समेंलनात तिला कायम  देवी ., राणी ., अश्या भूमिका बाई द्यायच्या ....कपाळाला टिकली किंवा  मोठे कुंकू लावले कि असे वाटायचे  ....सूर्यबिंब  उमटले कि काय .....
आम्हाला मुलगी पसंत आहे ...या वाक्यावर मंगल भानावर आली ....काही दिवसांनी लग्न झाले ..मुलगी मुंबईला दिली ....मुबई बडी बाका नगरी....या मोठ्या नगरात कुठल्याश्या चाळीत एका  खोलीत १५ /२० जनाच्या घरात  मंगल पडली होती ....तिला हे माहिती नव्हते ...ती फार रडली ...आणि कपाळ बडवून घेतले ...सासरची शेती -वाडी  कोकणात  भरपूर होती ....पण त्याचा काही उपयोग  नव्हता ......तीन -चार  महिने उलटले असतील ...तिला सागण्यात आले  कि आता तू नोकरी कर ....तिची  कुठलीही मानसिक स्थिती  नसताना  तिला रोज नोकरीला जावे लागायचे ...नवरापण कुठेतरी फडतूस नोकरीला होता ......तिला एकंदर संसार कळला .....नवरा ...नवर्याचे सुख तिच्या वाटेला काही येत नसे ...शरीरसुख हे कधीतरी चुकून मिळायचे ....सारे मनाविरुद्ध घडायचे ..त्यामुळे ती सतत कपाळ बडवून घ्यायची .....१ /२ वर्ष्यात तिला वाटायला  लागले ..आपले नशीब  फुटके  आहे ..आपले कपाळ ..त्यावरच्या  रेषा खोट्या आहेत .......तिला दाय्वोर्स घ्यावासा वाटू लागला ...पण सासरे  खूप  चांगले असल्याने  तिने निर्णय बदलला ...त्यावेळेस ती ३ /४ महिन्याची पोटुशी पण  होती ............त्यामुळे तिने निर्णय बदलला ...तिला कपाळ बडवण्या मुळे तिला डोकेदुखी जडली ......त्यात मुलगा झाला .....त्याचे कपाळही मंगल सारखे मोठे होते ... 
मुलाचा पायगुण आणि तिचे कष्ट  यामुळे तिने  ....मुंबई बडी बाका नगरी मध्ये स्वताचा एक फ्ल्याट बुक केला .....नवरा जरया चांगल्या पोस्टला लागला होता .....पण त्याचे लक्ष कायम तिच्या पैश्याकडे असायचे ....काही दिवसांनी ती फ्ल्याटमध्ये राहायला गेली .....जे सकाळी  निघायची   ते  थेट रात्री घरी  यायची ...लोकलमध्ये  निवडलेली  भाजी परतून  ...५/६ जनाचा स्वयपाक करून  जेवणे व्हायची .....एक दिवस भांडे घासताना तिच्या  सुंदर  कपाळाला   पाण्याचा  लोखंडी  नळ  लागला .....फार मोठी  खोक  पडली ....चार -पाच दिवस  ती  बेशुद्ध  होती ....नवर्याने  फार उशिरा  दवाखान्यात  नेली ....त्यानंतर दोन -तीन महिने  त्या निमित्ताने  मंगल माहेरी राहिली .........................
माहेरचे  -आजूबाजूचे ...लहानपणीच्या मैत्रिणी सर्व गोतावळा  जमला  होता .........ज्या जोगातीनीने कपाळ  भरले  होते  नेमकी  तीपण  अचानक  आली  मंगलच्या  कपाळवरची खोक पाहून म्हणाली ...........अग बाई कुंकू लावायच्या  जागेवरच गो तुझे  कपाळ  फुटले ...................



(-:..... ......:-)............स्वताशीच हसणारा माणूस by Rajendra Banait on Wednesday, 23 February 2011 at 17:11



 काही दिवस तो दवाखान्यात बेड-रिडन होता ...मग काही दिवस घरात ......जेवणे ..झोपणे ...पुस्तके ...टीव्ही ...स्वताशीच पत्ते खेळणे ....इतकाच दिनक्रम . एक दिवस त्याच्या बागेतील गणेश वेलीला  एक छान फुल आले ...ते पाहत असताना एक नाजूक बुल बुल सारखी चिमणी आली ...त्याच्या कानात तिचा  गोड किलबिलाट ...त्या फुलाचा ओलसर लाल रंग त्याच्या डोळ्यात शिरला .....तो ताडकन बिछान्यातून उठला ..आणि स्वताशीच गोड हसला ..... 
काही दिवसांनी तो सकाळीच उठून फिरायला लागला ....रस्त्याने जाणारी  ..झाडे ..पक्षी ..फुले ...गमतीशीर वस्तू ....चित्र विचित्र माणसे या सार्याच्या कोलाजातून ...तो पुन्हा समाजात ...वस्तुजातात   आला .....
घरातले कोणीतरी म्हणाले .....अरे बास झाले फिरणे ...परत पैसे कमवायला लागा आता .....तो पुन्हा स्वताशीच हसला .....त्याने स्वताशीच एक ,आरती संपल्यानातारची एक गोल प्रदक्षिणा घेतली .....स्वताच  पुटपुटला....काहीतरी करायला हवे ....त्याने नंतर मोठ्या जोमाने छोटा व्यवसाय चालू केला ...पण हे करत हसताना  तो कायम स्वताशी हसायचा ....कोणी त्याला आत्ता पर्यंत विचारले  नाही  तू .../ तुम्ही .....का हसता  ? ....
एकदा मात्र गंमत  झाली .....सकाळी  फिरायला जाताना   एक पाचवी -सहावीतील गोड मुलाने  त्याला अचानक थांबवून प्रश्न केला ...तुम्ही का स्वताशी हसता ...मी गेली तीन -चार महिने तुम्हाला  पाहतोय .....का हो काका असे का हसता ?.......त्यालाही  मोठी गंमत वाटली .....तो म्हणाला तू आजून लहान आहेस ...तुला नाही कळणार ....
अहो काका मला सांगा ना.....कारण मीपण वर्गात स्वतशीच हसलो  तर मला बाईंनी खूप मारले ...वरगाबाहेर हाकलून दिले .....काका सांगा ना ....
....................यावर हा गडबडला .....म्हणाला ....काही गोष्टी कळतात   ..पण त्या सांगता  येत नाही ...म्हणून स्वताशीच हसायला येते ......!......!!..................!!!