गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०११

......:-)............स्वताशीच हसणारा माणूस

 काही दिवस तो दवाखान्यात बेड-रिडन होता ...मग काही दिवस घरात ......जेवणे ..झोपणे ...पुस्तके ...टीव्ही ...स्वताशीच पत्ते खेळणे ....इतकाच दिनक्रम . एक दिवस त्याच्या बागेतील गणेश वेलीला  एक छान फुल आले ...ते पाहत असताना एक नाजूक बुल बुल सारखी चिमणी आली ...त्याच्या कानात तिचा  गोड किलबिलाट ...त्या फुलाचा ओलसर लाल रंग त्याच्या डोळ्यात शिरला .....तो ताडकन बिछान्यातून उठला ..आणि स्वताशीच गोड हसला ..... 
काही दिवसांनी तो सकाळीच उठून फिरायला लागला ....रस्त्याने जाणारी  ..झाडे ..पक्षी ..फुले ...गमतीशीर वस्तू ....चित्र विचित्र माणसे या सार्याच्या कोलाजातून ...तो पुन्हा समाजात ...वस्तुजातात   आला .....
घरातले कोणीतरी म्हणाले .....अरे बास झाले फिरणे ...परत पैसे कमवायला लागा आता .....तो पुन्हा स्वताशीच हसला .....त्याने स्वताशीच एक ,आरती संपल्यानातारची एक गोल प्रदक्षिणा घेतली .....स्वताच  पुटपुटला....काहीतरी करायला हवे ....त्याने नंतर मोठ्या जोमाने छोटा व्यवसाय चालू केला ...पण हे करत हसताना  तो कायम स्वताशी हसायचा ....कोणी त्याला आत्ता पर्यंत विचारले  नाही  तू .../ तुम्ही .....का हसता  ? ....
एकदा मात्र गंमत  झाली .....सकाळी  फिरायला जाताना   एक पाचवी -सहावीतील गोड मुलाने  त्याला अचानक थांबवून प्रश्न केला ...तुम्ही का स्वताशी हसता ...मी गेली तीन -चार महिने तुम्हाला  पाहतोय .....का हो काका असे का हसता ?.......त्यालाही  मोठी गंमत वाटली .....तो म्हणाला तू आजून लहान आहेस ...तुला नाही कळणार ....
अहो काका मला सांगा ना.....कारण मीपण वर्गात स्वतशीच हसलो  तर मला बाईंनी खूप मारले ...वरगाबाहेर हाकलून दिले .....काका सांगा ना ....
....................यावर हा गडबडला .....म्हणाला ....काही गोष्टी कळतात   ..पण त्या सांगता  येत नाही ...म्हणून स्वताशीच हसायला येते ......!......!!..................!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा