बाबा माझे पेढा तुम्ही का खाल्ला ....आई बघना माझा पेढा यांनी खाल्ला ..त्याच्या तिसरीतल्या मुलाने जोरात आरडओरड केला ....त्याच्या ओरडण्याने हा दचकला ...ओशाळला देखील ....असे काही बाबतीत त्याच्या कडून अधून -मधून होत राहते ...पण या वृतीला तो आवर घालू शकला नाही ....त्याला अनेक आठवणी आल्या ....एकदा कॉलेजचे मित्र भेटले होते ...बर्याच दिवसांनी एकत्र आले होते .....त्यातला एक नेमका मोठी परदेश वारी करून आलेला ...सर्व मित्रांमध्ये हाच गरीब ..म्हणजे जास्त पैसे कमावता न येणारा ....परदेशातून जो आला होता त्याने सर्वाना चोकलेट वाटली ...याला दोन -तीन वेगळ्या प्रकारची दिली ...सर्वांनी काही खाल्ली काही ठेऊन दिली ...गप्पा सुरु होत्या ...या पठ्ठ्याने सर्व खाऊन टाकली ....एका मित्राच्या लक्षात हि गोष्ट आली तो ..म्हणाला अरे याने एक पण ठेवले नाही ...सर्वांनी विचारले काय रे का असे केले ..हा याच्याच नादात म्हणाला ...मी आयुष्यात कधीच असली खाल्ली नव्हती .....पोराचा बाप जिंवत तर पोरे जिंवंत ...बापाची भूक नीट भागली तर बाप पोरांना जिंदगी दाखवू शकतो ..आणि खाऊही घालू शकतो ...बापाची ही फेज किंवा इछ्या अपुरी राहिली होतीना म्हणून सारी चोकलेट खाऊन टाकली ....
मित्र म्हणाले ...तुझे काही कळत नाही राव .....तो निघून गेल्यावर सर्वांनी त्याला भरपूर शिव्या दिल्या ...एक मित्र मधेच म्हणाला ..पण एक गोष्ट आहे राव ...हा जे मनाला येईल तसा बरोबर वागतो ...आणि याला जीवन आपल्यापेक्षा थोडेतरी जास्त कळले आहे .....सर्वांनी एका सुरात हे कबूल केले .....
पण हा राव त्याच्या अनेक कारणासाठी हा लोकांना काहीना काही मागत असतो ..पैसे तर जास्त ...पण हा उशिरा का होईना लोकाचे ..बँकचे पैसे परत देतो बरे का ....बुडवत नाही ......
दाढीच्या दुकानात बसल्या -बसल्या त्याने स्वताला नीट निरखले ...बघतो तर काय ...पाठीमागे तोच ...तोच ...त्याचेच प्रतिबिंब एकात एक ...असे पार मुंगी होईप्रयंत ...सलून मध्ये लावारिस मधले गाणे जोरात लागले ...आपका क्या होगा जनाबेआली ....मग तो स्वतात परतला ...दाढी पिकलेली ...केस तर संपूर्ण पांढरे होण्याच्या मार्गावर .....अशातच त्याला गौरी देशपांडेची दुस्तर हा घाट ही कादंबरी आठवली .....त्यातले एक वाक्य आठवले ...आपली दुखे आपल्याला आपल्या उगमाशी नेतात ...........ओ साहेब कलप मारायचा का दाढी नंतर ?...तो भानावर आला ...तुझ्या आयची ..***..मी कधी लावतो का कलप ?...चल दाढी कर लवकर ...स्वताचा चेहरा त्याने मोठ्या आरश्यात पाहायला सुरवात केली ....त्याला कळले आपण वयाच्या मध्यावर आलोय ....खंगलेला निस्तेज चेहरा त्याचा त्याला पाहवेना ....इकडे redio जोरात ...आपने जो मांगी दुवाये ओ अनसुनी फरियाद है.....स्वताला शिव्या देत तो म्हणाला ...आई -बाप -मुले -बायको सर्व असून आपण लावारिस आहोत ....
मिंधे आहोत या जगाचे ....ही भावना फार प्रबळ झाल्याने तो ..जोरात म्हणाला ...डोकेपण भादरून टाक.....सलूनवाला म्हणाला ...काहो कुणी घरातले गेले कि काय ? हा म्हणाला ...मिंधा झालेल्या माणूस म्हणजे एक प्रकारे मेलेलाच असतो ....मीच मेलोय ...काप सगळी केस ......तेवढ्यात रेडिओवर गाणे लागले सजना है मुझे सजना के लिये .....! बंद कर तो रेडिओ ...काप लवकर ....थोड्या वेळाने सलून मधून बाहेर पडून ....त्याने एक सिगारेट पेटवली ...शून्यात हरवला .....समाज ...व्यवस्था ...जाती ...उच्च -नीच ...काळा-गोरा ...ब्राम्हण ..ब्राम्हणेतर ....श्रीमंत -गरीब ..........कॉलेज मध्ये इको.च्या वर्गात आपण मार्क्स कसा शिकलो आणि मराठीच्या वर्गात त्याच वेळेला बाबुराव बागुल यांचा कवितेचा जन्म हा धडा कसा शिकलो ...........या सर्न्वाचा परिणाम आपण कविता करायला लागलो ....दिवास्वप्नात रंगायला लागलो ...करियर विसरलो .....काय करायचे असते जीवनात याच वेळेला आपण जीवनापासून फार दूर पळालो .....उसनवारी ....हातउसने....कर्ज .......इछ्या पूर्ण करण्याच्या नादात ...ध्येय विसरलो ......खूप काही होतो ...खूप काही कराचे होते ...पण अंड ठेचलेल्या बैला सारखी अवस्था झाली ...........या जीवनाचा मिंधा झालो मिंधा ..............फक्त मिंधा .....मिंधा ....मिंधा ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा