- पहाटेचे चार वाजलेत ...परी डोळ्यात स्वप्न आणि सत्य घेऊन उठते ....स्वताचे आवरते ...घरातले आवरते ....सकाळी थंडीमध्ये स्टेशन वर साडेसहाला हजर....लोकलचं गार धूड ...परी स्वताचा डबा शोधते
..चाके फास्ट होतात ..लोकल च्या गतीतून जीवनाच्या गतीला अधिकच वेग येतो ...स्वप्नातून सत्यात ....आणि सत्यातून स्वप्नात असा दुहेरी खेळ परी खेळत असते .....सोबतीच्या आया..बायांना चीअर अप करत परीचे संवाद चालू होतात ...अनेक घटकांशी ...जसे कि एका टीवीत १०० च्यानेल दिसतात ........................................................
........हसणे -खिदळणे - रडणे ...घरातले प्रश्न ते थेट भारताच्या प्रश्नावर परी बोलत असते ......मनात येते केव्हा झाला असेल तिचा अभ्यास आणि कोणी शिकवले असेल तिला ...... पंचवीस वर्ष्ये नोकरी करून स्वताचे पंख तुटत असताना जिने स्वताला पहिले .....आणि जटायू सारखे परोपकार करत जिचे जीवन आजूनही गतिमान आहे .....लोकलच्या अनेक चाकांना जसा हळूहळू ब्रेक बसतो .....तसे \तसे तिचे सर्व विचार हळू -हळू थांबतात .....आणि हळूच ती स्वतामध्ये एक गिरकी घेऊन लोकलच्या बाहेर पडते ....
.......बाई तुम्ही रोज कश्या हो इतक्या लवकर येता ...ऑफिस-बॉय चा प्रश्न .......परी काहीच बोलत नाही ....उलट त्याला विचारते ..तुझी बायको कशी आहे .....तू मुलाला काल दवाखान्यात घेऊन गेला होता कि नव्हता ......मग टेबलावरच्या देवाला नमस्कार करून कामाला सुरवात करते ........सारे तिच्या ताकदीवर ...,बुद्धीवर जळतात .......अगदी साहेब देखील .........
मग काम करता -करता ती आपल्या सर्व आवडीच्या लोकाचे प्रोब्लेम सोडवत बसते .......कधी -कधी मधेच रेडिओच्या गाण्यात आपले छान सूर जुळवून टाकते .......कामाचा डोंगर उपसून टाकते ......मग आळोखे -पिळोखे देवून म्हणते ......अरे अनिल ...चहा दे जरा .....आवडीचा चहा पित.....त्याच्याशी गप्पा मारते ........
..........................................ऑफिस संपते .......मग पुन्हा घराकडे जाताना घरातले काय हवे -काय नको ते घेत -घेत ....घर गाठते .....
परी घरात आली ना मग .....एक साधी बाई होते .......आणि मग पुन्हा घरातील कामे ....घरातील नेहमीचे रुटीन ......
परीला झोपायला रात्रीचे एक -दोन होतात ........कोणाच्या स्वप्नात जाण्याची वेळ टळून गेलेली असते ......परी पोटाशी पाय दुमडून कुक्कुल्या बाळासारखी झोपी जाते ......
......तुटके पंख अधिकच तुटत चालेलेत ..पण परी घाबरत नाही .....परी तशीच उडत असते ......रोजच ..........
रविवार, ६ मार्च, २०११
पंख नसलेली परी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा