रविवार, ६ मार्च, २०११

डोहातील जलपरी....... ! by Rajendra Banait on Sunday, 30 January 2011 at 01:28


पुन्हा तू..................... !कसे मनाला सागायचे समजून ? तुझ्या नजरेतून मी अस्तमानाच्या सूर्यासारखा बुडत जाताना मी मला पाहतो ......आणि मी पुन्हा धीर धरून विचारतो ...तुझे माझ्यावर प्रेम आहे..............?.तुझ्या डोळ्यात संधिप्रकाश ....... तुझ्या अल्लड आवाजातून तू पुन्हा मलाच  विचारतेस ......तुला मी झेपवेल का रे  बाबा खरे सांग..... ?  सारे अंधारून येताना मी एखाद्या चुरागलेल्या कागदाच्या बोळ्यासारखा लांबवर उडून जातो ........माझ्या आतल्या वादळात मी हरवून जातो ....आणि ती डोळ्यातील काजळ सारखे करत असते .......माझ्या भेट दिलेल्या हातरुमालाने..................
.
स्वतालाच समजून सांगत आपण आपले झोपायचे .....कळत असल्यापासून ......प्रेमळ सखी आपल्या आयुष्यात असावी हे सर्वाचे स्वप्न ....वास्तवात सखी वेगळी असते ....प्रेमळ  पण  स्वतात हरवलेली ...दूरच्या प्रदेशातील ........ती पंख लाऊन निघून जाते ...आणि  आपण शनी माहात्म्यातील  हात -पाय  तोडलेल्या  राजा विक्रमासारखे  तेलाच्या  ...वास्तवाच्या ...पैसे कमावण्याच्या  घाण्याला  जुंपलेलो ............
मध्ये एकदा तू बोलता -बोलता म्हणालीस ....कविता सोडून तुला काय करता  येते ...?  मी हतबल स्वरात म्हणालो ...काही नाही ....तेव्हा तू पुट -पुटलीस ..काही खरे नाही रे बाबा तुझे ...........कसे होणार रे राजा तुझे ? 
टोपी हरवलेल्या भिकारी राजासारखी माझी स्थिती ......आणि  तू पुन्हा क्षितिजा पर्यंत पोहोचलेली ..........दूर ......फार दूर .....फार दूर  अंधारात विलीन झालेली ....काळ्या जलाच्या  डोहातील जलपरीसारखी .........


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा