रविवार, ६ मार्च, २०११

बालपणीचा १५ ऑगस्ट By Rajendra Banait · Sunday, 15 August 2010


बालपणीचा १५ ऑगस्ट.........:----        १५ आगस्त म्हटला कि ,मला पहिले आठवते ५ पैशाचा पांढरा खडू आणायचा ..तो कापडी बुटाला रगडून लावायचा .....एखादी लेसची बाजू नेहमीप्रमाणे मातकट रहायची ...एका डोळ्यात चिपाड राहाय्लेले ... पीटीचे सर घाई घाई ने रांगा लावायचे ...मोठ्या करण्या वरती जाड्या भरड्या आवाजात राष्ट्गीत व्हायचे .... दोन पारलेचेबिस्किटे मिळायची ..किंवा भेळीचा बारका पुडा ... तो खाता -खाता घरी जायचे ...तांब्यांनी केलीली इस्त्री केव्हाच मोडून गेलेली .... पाढरे बूट केव्हाच घाण झालेले .....वेग-वेगळ्या गल्यातून टाइमपास करत घरी येऊन मस्त झोपणे .......
झोपेतून उठल्यावर दूरदर्शनवर कुठला तरी राष्ट्र भक्तीपर सिनेमा कृष्ण-धवल रंगात बघायचा ... थोडासा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करायचा ....पण एक त्यावेळी कळले नाही ....स्वतंत्र म्हणजे काय ..? युद्ध म्हणजे काय ..? भारत -पाकिस्तान वेगळे कशासाठी झाले ..?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा