रविवार, ६ मार्च, २०११

साडीचा वास ....................... By Rajendra Banait · Saturday, 06 November 2010


स्त्रीयांना  साड्या खूप आवडतात ...नवीन साड्यांना ,जुन्या साड्यांना स्वताचा एक वास आसतो ..आणि तो वास अनेक आठवणीत घेऊन जातो ..रंगभूमीचे मोठे कलाकार  काशिनाथ घाणेकर हे तर आई वारल्यावर  आईची आठवण आली कि मोठ्या पेटीतून आईच्या साड्या काढून त्याला आवळून झोपायचे ..आजीचा साडीचा वास .,आईच्या साडीचा वास .,बहिणीच्या साडीचा वास .,बायकोच्या साडीचा वास ...अश्या कित्येक स्त्रीयाच्या साड्याचे वास माणसाला जुन्या भूतकाळात घेऊन जातात ..
<span>या वासामध्ये काही अत्तराचा वास ..,सारवलेल्या शेणाचा वास .,स्वताच्या शरीराचा वास .,जिथे राहतो तिथल्या वातावरणाचा वास  ....आसे सर्व वास एकत्र होऊन एक गंध त्या साडीला   ..,त्या स्त्रीला चिकटून आसतो ..काही वासामुळे काही चित्रे .,प्रसंग .,आठवणी ..,डोळ्यासमोर  दाटून येतात ...आणि  गंधाबरोबर माणूस त्या आठवणीत हरावून जातो ...
मी जेव्हा साड्या खरेदीला जातो तेव्हा ..अनेक प्रकारच्या ..पोताच्या साड्या खुणावत असतात ..काही रंग .,काही चित्रे ..,काही डिझाईन .,काही इम्ब्राडरीस,,. गोंडे ..,जोर्जेट..,इरकली /.सिल्क / सिफोय्न /बटर सिल्क  /रेशमी /सुती /चुनडी /किती प्रकार असतील ते चोखानदल स्त्रीला माहित आसतील ..परत त्या धुवायच्या कश्या ......इस्त्री करायची का नाही ....बर्याच गंमती ......
मी पुरुष असून जेव्हा साडी खरेदीला जातो ना तेव्हा मी पण हरखून जातो ....गेली १५ वर्ष्ये मी साड्या खरेदी करतो ..पण मला कधीही कंटाळा आला नाही ...पण बायाकासारखा मी जास्त वेळ लावत नाही ...साडी घेणे म्हणजे एक मस्त मजा आसते ....आणि एखाद्या  चित्राच्या  प्रदर्शनाला जातो  ना तसा फील आणि आनंद  मला साडी घेताना येतो ......मी माझ्या बायकोला ..,बहिणीला ..,आईला ..,वाहिनीला  जेव्हा साड्या आणतो ना  तेव्हा  एक बहिण सोडल्यास  माझ्या साड्याचे बर्यापैकी कौतुक होते ......कधी -कधी बदलण्याचे प्रसंग पण येतात ....
पण आमच्या घरातील स्त्रिया चलाख ....त्या म्हणतात  राहू द्या आता ...परत नन्तर आणायच्या आहेत कि तेव्हा  आम्हीपण येऊ...म्हणजे काय  परत त्यांच्या मन -पसंतीच्या  साड्या  घेण्यासाठी जावे लागतेच ................................................................................आणि मलाही ते आवडते ..
</span>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा