लालन सारंग ...मला लहानपणीपासून त्या आवडायच्या .......त्याच्या काही सिरियल्स पहिल्या ...पण नाटके पाहता आली नाही ...भारदस्त बेसचा आवाज ...औंधला फोटो-फास्टच्या दुकानात मी शिरलो तर ..तलम काळ्या साडीतल्या भुवया प्लकर केल्रल्या लालनताई दिसल्या ....मी त्यांना विचारले तुम्ही ,..लालन सारंग का ? त्या हो म्हणाल्या ...! मी त्यांना म्हटले ..मी तुमचा लहानपणापासूनचा चाहता आहे ...एक विचारु का? एन्कीच्या राज्यातला विलास सारंग तुमचा कोण ? त्यावर त्या म्हणाल्या आडनाव बंधू ,,! त्याचे करारी पाहणे ....रझा मुराद सारखा बेसचा आवाज ....काळी साडी ...स्पष्ट उच्चार ...मंद हसणे फक्त ओठात ....! फार कमी स्त्रिया अश्या असतात
कमलाकर सारंगच्या मृत्यू नन्तर त्या पुण्याला आल्या ...औंध मध्ये त्या राहतात ...मी पुण्याला जायला निघालो कि त्या मला दिसतात ...कधी कधी ! फार बरे वाटते त्यांच्याकडे बघितल्यावर .....नेहमीच त्या एकट्या असतात ....उठून दिसतात ..! त्याच्याकडे बघून नेहमी वाटते ,,यांच्याशी खूप बोलावे ...पण एक प्रकारची अनाम रेषा त्याच्या देहबोलीतून होते ...मग बोलण्याचं धाडस कमी होत जाते ..धुक्यातला ..काळापर्वत कसा आसतो तश्या त्या माझ्या नजरेतून लांबच -लांब निघून जातात ..........................................................खूप वाईट वाटते अशी माणसे आपल्या जीवनात नाही म्हणून ...!!!!!!!!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा