मला एका मराठीच्या प्रधापाकाचा फोन आला ..,अरे बानाईत तांबे गेला ....त्या आगोदर मी तीन महिन्यापूर्वी बोललो होतो ...तेही १५ वर्षानंतर ...त्याचा किरता आवाज बोल राजू काय म्हणतोय .., आरे अंगावरून वारे गेलेय माझ्या चालता येत नाही .., कसातरी जगतो आहे ...मी त्याला म्हणालो मागील काही दिवसात मी भविष्य पाहतो आहे ...तू तुझी जन्मतारीख सांग....त्याने ती सांगितली ..,मी म्हणालो अभ्यास करून काहीतरी झाडपाल्याचा तोडगा सुचवतो ..,तो म्हणाला ,कायकायाचे ते कर आणि वसईला येऊन जा ....!!!मी अभ्यास केला नाही (नेहमी प्रमाणे आळस)काही दिवसांनी २ च महिन्यांनी कळले तांबे गेला ....फार वाईट वाटले ....आयुष्यात सर्वात प्रथम मला कविसंमेलनाची सूत्रे हाती देणारा तो माझा पहिलाच मित्र .....अध्यक्ष पद भूषवत होते ...नारायण सुर्वे ....मी घाबरलो ..आरे तांबे गडबड उडाली तर ....तो म्हणाला राजू तुझ्या ठेवणीतल्या कविता काढायच्या आशय वेळेला ......कशीतरी सुरवात केली ...संमेलन अर्ध्यावरती आलेले ...सुर्वे मास्तरांची चुलबुल चालू होती ....आणि अचानक तडक मास्तर बाहेर निघाले ....तांबे घाबरला ...तो त्यांना गेला शोधायला .....माझी पक्की फाटलेली .१०-१२ कवी कविता वाचून झाले ....मी म्हणालो सुर्वे मास्तर गेले .....(लोकांनी आगोदर घाबरून बघितले आणि त्याच वेळाला तांबे धावत आला ..खुणांनी सांगितले मास्तर सु -सु करायला गेले होते .....प्रेक्षकातून हसण्याच्या लाटा येत होत्या)मास्तर पाठीमागून आले आणि खड्या आवाजात म्हणाले ..काही -नाही पावसाळ्याच्या दिवसात येतेच दाटून ...! लोक परत हसले .....मी काही गेलो नव्हतोय......तर ते जाऊ द्या आता आलो आहे तर ४-५ कविता म्हणूनच जाणार ...........त्यातली सर कर एक एक गड मला काही प्रमाणात पाठ होती तिची थोडीफार नक्कल करत माईक मास्तरांच्या हाती सोपवला ......मग काय म्हणता सर्वांनी सोबत गायचेच असा मास्तरांचा हट्ट त्यामुळे एख्याद्या रॉक कार्यक्रमाचा फील येत होता ......सगळे त्यांच्या कवितेत,,, स्वरात,,,, तन्मयतेने तादात्म पावले होते ...... आता नारायण सुर्वे पण नाहीत आणि वसईचा बोकड दाढी ठेवणारा अशक्त सिद्धार्थ तांबे पण नाही ............!!!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा