सिगारेट सोड रे आता ..बास झाले ...स्वतात हरवलेल्या माणसाला अश्या शिकवणीच्या स्वराने भान येते ...पण हा असाच एका वलयातून दुसर्या वलयात विलय पावणारा .....एस .टी..स्थानकावर एक छान सुविचार लिहिलाय गांधी बापूंचा ..नशाखोरी धीमी आत्महत्या है...!हे वाक्य वाचून तो आत खूप चपापला होता ..पण ..पण खूप काही आहे सागण्यासारखे पण ते सांगता येत नाही अजून ....आणि सांगितलेले पोहचत नाही अजून ....अहो जेवायला येता ना....बायकोच्या अश्या स्वराने तो नेहमी दचकतो ...तो स्वताला विचारतो ही कधी आली आयुष्यात ?...मुले जोरात ओरडतात कानापाशी ....आईने जेवायला बोलावले आहे ....तो मुलांकडे अनोळखी नजरेने पाहतो ...हे कधी आले आपल्या आयुष्यात ....अमिबासारखे आपले विघटन कधी झाले ...आपली प्रायवसी अशी कायम डिस्टर्ब का झालीय ..?....म्हातारी झालेली आई म्हणते सिगारेट सोड आणि विचार करणे सोड आता ...आम्ही तुला किती दिवसाचे ....? कोणी कोणाला पूरत नाही ..कॉलेज मध्ये असताना आपण वर्गात मध्यल्या सुट्टीत वर्गात कोणी नाही पाहून आंधी मधले ...तेरे बिना जिन्दिगीसे कोई हे गाणे म्हणत असताना ...दोन मुली आल्या ..त्यांनी बरीच विचारपूस केली ...त्याच्या आग्रहाखातर तू ग्रेसचे घर थकलेले संन्यासी म्हणून दाखवले ....आणि ...पुढचे तुला आता आठवायचे नाहीये ...तो स्वताला त्या दिवसापासून स्वतात हरवला ...सिगारेटी पिऊ लागला ...वलय ...वलय ...वलयाला बिंदू नाही .......
......स्वताला निरखने ...स्वताशी हसणे........ .स्वताला समजावताना किशोरकुमार गात राहणे ...तुला निळा रंग का आवडतो ...? तू पारिजातकाचा वास घेतल्यावर का शाहार्तोस....एख्याद्याने जर तुझ्याकडे रोखून पहिले ..तर तू का भाम्बावतोस.....कुणी विचारले तुमचे नाव काय .....तुम्ही काय करता .......तर तुला अजून सांगता येत नाही ...तू का घाबरतोस अजूनही कोणी चिडून बोलल्यावर .......आपल्याला अजून सगळेच समजून घेणारे कोणी नाहीत याची तुला खात्री पटल्याने तू का पळून जातो स्वतापासून .....का का का ...............
...
काही केल्या स्वताला आता बदलता येत नाही याची खात्री पटल्यावर ...तू प्रत्येकाशी भेटणे आता औपचरिक ठेवले आहेस ...लोक म्हणतात ...तुम्ही बोलताना मधेच कुठे हरवता हो .....तू ओशाळून म्हणतो ..कुठे काय ...काही नाही ...........आरती प्रभू अश्या वेळेला तुला आठवतात .......अंत झाला अस्ता आधी ... जन्म एक व्याधी ...वेदनाची गाणी म्हणजे ....निव्वळ पोकळ समाधी ..............स्वताला कितीही सापडवायाचा प्रयत्न केला तर ....आपण आपल्याला फार कमी वेळा सापडतोय ..हे तुझ्या लक्षात आलाय ....................मग तू पळत सुटतो ...स्वतातून स्वताकडे ......हे वारीचे रिंगण किती दिवस आणि कुठे पर्यंत चालणार .......स्वतावरची झूल उधळून घोडा वारीतून कुठे पळून जाणार ...? ....आता कुठे जायचे ..काय करायचे ....कशासाठी जगायचे ...............पुन्हा पळणे....विचाराची कुत्री मोकाट मागे लागलीत आपल्या मनाच्या ..........
बसचा कन्द्क्टार जोरात ओरडतो ...त्याच्याकडे रोखून पाहत म्हणतो कुठे उतरायचे होते तुम्हाला ? शेवटचे स्टेशन आलाय ना .....च्यायला कुठून कुठून येतात ही माणसे.......!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा