हायस्कूल चे दिवस ......सिनेमा गाजत होता ...कुदरत ...राजेश ...हेमा ...सुप्रसिद्ध गाणे ..हमे तुमसे प्यार कितना .....किशोरकुमार ....बेगम परवीन सुलताना .......दोघाच्या आवाजातले .......हे गाणे वाटले नव्हते आयुष्यभर पुरून उरेल ...दहावी पर्यंत हे गाणे मुखोद्गत झालेले ....गाणे कुठूनही ऐकू आले ...कि डोळ्यात पाणी आपसूक येणार ......काही काळ निघून गेला ...कॉलेज चे दिवस सुरु झाले .......
.........या गाण्याने आपले खरे रूप दाखवण्यास सुरवात केली ......एकतर्फी प्रेमात पडण्याची साथ साधारणत ऑगस्ट ...सप्टेबरला चालू होते ....आमची बरीच्ग मित्र -मडळी या आजाराने ग्रासली ....काही मुलीच्या प्रेमात तर ५ -५ ../६ -६ मित्र पडल्याचे laksaht येत होते ...
मी तरी यातून कसा सुटणार ......गाणे तर पाठ झालेले .......जराश्या बुद्धिमान आणि गोड किनर्या आवाजाच्या एका मुलीच्या प्रेमात मी पडलो .....साथ जोरदार असल्याने .....उपाय म्हणून अजागळ राहणे ....सिगारेटी पिणे ....रेक्टर नसेल तर मित्रंच्या खोलीत दारूकाम करणे ...मैफिली भरवणे .....रडक्या गझला ...रडकी मुकेश ..रफी ....किशोरची गाणी दारू पीत म्हणत राहणे .....मग मुलीवर चर्चा सुरु ......कोण ...कोणाला लाईन देते ...कोण कोणाच्या जवळ राहते ...कोणाचा भाऊ गुंड आहे ...कोणाचे वडील पोलीस आहेत ......जाम चर्चा रगयाच्या......मग कोणीतरी अचानक रडायला सुरुवात करायचे .......ती नाही म्हणाली रे ....हा रे इतका लाम्बयाचा कि वाटायचे ह्याची आई वारली कि काय ......मग त्याची समजूत काढणे सुरु व्हायचे ............मग परत €दारू आणायला सांगणे ....चिल्लर जमा करणे ...हातातले घड्याळ विकणे ...फीचे पैसे खर्च करणे ....असे करून दारू पीत पीत ....आठवणीच्या महापुरात वाहत जाने ....एखादा काठावरचा हळूच म्हणायचं .....
...........................तुम्हे कोई ओर देखे तो जलता है दिल
......हे असे आठवडाभर किंवा महिना -महिना चालायचे .....काहींचा रोग आपोआप बारा व्हायचा ...कोणाचा मार खाऊन...कोणाचा माघार घेऊन ....कोणाचा होकार मिळाल्यामुळे ......आणि माझ्यासारख्या बर्याच जनाचा हा रोग अंगात मुरायाचा .........................काही जोड्या मग फिरताना €दिसायच्या ....मग आत -आत तडफड.....मग परवीन सुलताना याचा मोठा -थोरला आलाप पोटातून ...ओठातून ...सद्गदित आवाजात निघायाचा .....हमे तुमसे प्यार कितना ................................
मी माझ्या आयुष्यात किती तरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडलो होतो ......अजूनही काही मुली आता दोन लेकराच्या बाया ....कधीतरी त्यांच्या नवर्या बरोबर दिसतात ..............मग जुन्या जखमा पुन्हा ओल्या होतात .....आणि आतला किशोरकुमार भर रस्त्यावर गाऊ लागतो ....................
तुम्हे कोई और देखे तो जलता है दिल ..बडी मुश्कीलोन्से फिर गुजरता है दिल .....क्या क्या जतन करते है ....तुम्हे क्या पता...
एक सुंदर कविता ......
उत्तर द्याहटवाmvkapuskari.blogspot.com