मंगळवार, ८ मार्च, २०११

वाळीत टाकलेला माणूस ........... by Rajendra Banait on Monday, 07 March 2011 at 16:26


मध्यरात्री चोरपावलाने तो उठला ...पायात चपला अडकवल्या .खिसे चापपले काही पैसे आहेत ,हे जाणवल्यावर त्याला हायसे वाटले ....नाक्यापर्यंत चालत गेला ...सिगारेट पेटवून तो एस .टी.स्थानकाकडे जाणार्या बसची वाट पाहत राहिला .......सकाळचा प्रसंग आठवला ..आणि डोळ्यातील दाटून आलेले कढ बाहेर निघायला लागले .....गल्लीत एका माणसाला त्याने खूप मारले ...त्या माणसानेही खूप मारले ...कारण काय होते ...तो माणूस याला म्हणाला ..माहितीय  तू फार हुशार आहे ..ज्या साठी बोललो ती माणसे केंव्हाच गायब झालेली ....घरातील  लोकपण म्हणाली नसती हुशारी कशाला करायची ...इतके वाटत असेल तर बाहेरच्या लोकांची सेवा करायची आणि त्यांच्या बरोबर बाहेरच राहायचे .....तुम्ही मेलात तर घरचे रडतील बाहेरचे येतील का ? असल्या  अनेक प्रश्नांना  तो कायम  निरुत्तर व्हायचा ...शिकला खूप ...लोकांना डिग्र्यापण कळायच्यात नाही .
शेवटची बस आली ..सिगारेट विझवून तो बस मध्ये बसला ....बरेचसे प्रवासी याच्याकडे रोखून पहिला लागले ....कंडक्टर म्हणाला ...शर्ट-बनियन आहे का नाही पाव्हणे ....दारू उतरली का नाही अजून ? याच्या लक्षात आले आपण फक्त प्यांट घातलीय ...तो कसनुसे हसला ....नाही हो मी दारू नाही पित...विचाराच्या  नादात  विसरलो ...बसमधला एक पोक्त माणूस म्हणाला ..घरी भांडण झाले काय मर्दा..?....त्याने गपचूप तिकीट काढले ....काही न बोलता बसून राहिला ....बर्याच दिवसांनी कोणीतरी  आपल्याला मर्द म्हणाल्यामुळे तो आनंदी झाला ....दहावीला असताना वर्गात मारामारी झाली ..पोरांनी  गणिताच्या सरांना दणकून मारले ....हा  सरांची बाजू घेऊन पोलिसांपर्यंत गेला ......तेंव्हा गणिताचे सर म्हणाले ...तू  मर्द आहेस ..! पोलिसांनीपण याचे कौतुक  केले .....
एस .टी. स्थानक आले ....बसमधून हा उतरला .....मगाचा पोक्त माणूस म्हणला...घरी जा मर्दा ...डोक्यात राख घालून  काही मिळत  नाही ....हा काही न बोलता ...स्थानकावर आला ...सिगारेट पेटवली ....शेवटचे बंड करावे का ? या विचारात तो पडला ...हे शहर सोडून सरळ आदिवासींमध्ये जायचे  किंवा  आपली  भाषा जिथे  बोलली जात नाही अश्या प्रदेशात  जायचे .......आई ,बाप , बहिण .बायको .तीन मुली ,या सर्वाना सोडून जायचे ......?त्याला काही कळेना .....डोके चालेना ...काय करावे समजेना ......या विचारात असताना तो पोक्त माणूस त्याच्या शेजारी आला ....म्हणाला ..मर्दा कधी दारू प्याली का नाय ? हा म्हणला नाही हो .....एक काम कर मर्दा माझ्यासंगट पिऊन बघ ....
,,,,,,,,,,,,,,,,,,,हा पहिल्यांदा दारू पिला....खूप रडायला लागला ...रडत म्हणाला ...शहाण्या माणसाचा  समाजाला उपयोग  नसतो ....शिकून काही भेटत नाही ...मित्र -बित्र ...सगळे झुठ ......आई -बाप जन्म देतात ....बायको तिच्याच नादात ....त्याच्या गप्पा ऐकून  तो पोक्त माणूस म्हणाला ...गड्या तू चांगला आहेस ...पण ही दुनिया नाही न तशी ......मी एके काळाचा पहिलवान होतो ...लोक मला घाबरायची .....पण माझी काळीज सश्याचे व्हतं..........याला दारू चांगलीच चढली होती .....काहीपण बरळत तो स्वताशीच  म्हणत होता ...लोकांनी मला ओळखले नाही .....मी काय असे केले ...माझा सगळे राग -राग करतात ......
पोक्त माणसाने याच्या खिशातले पैसे काढले आणि हळूच निघून गेला ........कंट्री बारच्या शेजारी मोठ्या बिल्ड्निगीचे काम चालू होते ...तिथल्या  वाळूच्या ढिगात हा बरळत झोपी गेला .....!!!



1 टिप्पणी: