चला उशीर फार झालाय ...मुलीला लवकर आणा..मंगलला दाखवण्याचा कार्यक्रम चालू होता ....मंगल आली माजघरातून बैठकीच्या घरात ....तिला पाहिल्या -पाहिल्या सर्वजन म्हणाले ...मुलीचे कपाळ किती मोठे आहे ...आत्ता पर्यंत असे कुठेच बघायला मिळाले नाही .....मग चर्चा =प्रश्नोतरे सुरु झाली .......................................आणि मंगल भूतकाळात गेली बर्याचवेळ .......लहानपणी तिचे कपाळ पाहून एक जोतिषी म्हणाला पोरगी थोरमोठाच्या घरात पडणार ....शाळेतील वर्गातील मुली तिच्या कपाळाला हात लाऊन पाह्याच्या ....एकदा एक जोगतीण त्यांच्या घरासमोर आली तिने हिचे कपाळ पाहून आपल्या कुंकवाने मळवट भरला ...त्यावेळाला मंगल साक्षात देवी दिसत होती ...आजूबाजूच्या सर्व बायका तिच्या पाया पडल्या ......शाळेच्या स्नेह -समेंलनात तिला कायम देवी ., राणी ., अश्या भूमिका बाई द्यायच्या ....कपाळाला टिकली किंवा मोठे कुंकू लावले कि असे वाटायचे ....सूर्यबिंब उमटले कि काय .....
आम्हाला मुलगी पसंत आहे ...या वाक्यावर मंगल भानावर आली ....काही दिवसांनी लग्न झाले ..मुलगी मुंबईला दिली ....मुबई बडी बाका नगरी....या मोठ्या नगरात कुठल्याश्या चाळीत एका खोलीत १५ /२० जनाच्या घरात मंगल पडली होती ....तिला हे माहिती नव्हते ...ती फार रडली ...आणि कपाळ बडवून घेतले ...सासरची शेती -वाडी कोकणात भरपूर होती ....पण त्याचा काही उपयोग नव्हता ......तीन -चार महिने उलटले असतील ...तिला सागण्यात आले कि आता तू नोकरी कर ....तिची कुठलीही मानसिक स्थिती नसताना तिला रोज नोकरीला जावे लागायचे ...नवरापण कुठेतरी फडतूस नोकरीला होता ......तिला एकंदर संसार कळला .....नवरा ...नवर्याचे सुख तिच्या वाटेला काही येत नसे ...शरीरसुख हे कधीतरी चुकून मिळायचे ....सारे मनाविरुद्ध घडायचे ..त्यामुळे ती सतत कपाळ बडवून घ्यायची .....१ /२ वर्ष्यात तिला वाटायला लागले ..आपले नशीब फुटके आहे ..आपले कपाळ ..त्यावरच्या रेषा खोट्या आहेत .......तिला दाय्वोर्स घ्यावासा वाटू लागला ...पण सासरे खूप चांगले असल्याने तिने निर्णय बदलला ...त्यावेळेस ती ३ /४ महिन्याची पोटुशी पण होती ............त्यामुळे तिने निर्णय बदलला ...तिला कपाळ बडवण्या मुळे तिला डोकेदुखी जडली ......त्यात मुलगा झाला .....त्याचे कपाळही मंगल सारखे मोठे होते ...
मुलाचा पायगुण आणि तिचे कष्ट यामुळे तिने ....मुंबई बडी बाका नगरी मध्ये स्वताचा एक फ्ल्याट बुक केला .....नवरा जरया चांगल्या पोस्टला लागला होता .....पण त्याचे लक्ष कायम तिच्या पैश्याकडे असायचे ....काही दिवसांनी ती फ्ल्याटमध्ये राहायला गेली .....जे सकाळी निघायची ते थेट रात्री घरी यायची ...लोकलमध्ये निवडलेली भाजी परतून ...५/६ जनाचा स्वयपाक करून जेवणे व्हायची .....एक दिवस भांडे घासताना तिच्या सुंदर कपाळाला पाण्याचा लोखंडी नळ लागला .....फार मोठी खोक पडली ....चार -पाच दिवस ती बेशुद्ध होती ....नवर्याने फार उशिरा दवाखान्यात नेली ....त्यानंतर दोन -तीन महिने त्या निमित्ताने मंगल माहेरी राहिली .........................
माहेरचे -आजूबाजूचे ...लहानपणीच्या मैत्रिणी सर्व गोतावळा जमला होता .........ज्या जोगातीनीने कपाळ भरले होते नेमकी तीपण अचानक आली मंगलच्या कपाळवरची खोक पाहून म्हणाली ...........अग बाई कुंकू लावायच्या जागेवरच गो तुझे कपाळ फुटले ...................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा