रविवार, ६ मार्च, २०११

punha patra By Rajendra Banait · Wednesday, 28 July 2010


फेसबुकच्या सर्व मित्रांना मानाप्रमाणे नमस्कार .वि. वि .
तुमच्या पत्राचे उत्तर मिळाल्याने लगेच पत्र लिहायला घेतले ..आताशा पत्र लिहिताना हात थरथरतात ...... चहाची बशी देखील थरथरते .आपण सगळी फेस्बुक्मुळे खुशाल आसल्याचे कळले आणि आनंद वाटला ....पूर्वी गल्लीत पोस्टमन आला कि सासुरवाशिणी त्याच्याशी डोळ्यानेच बोलायच्या .... किती धाकात होत्या सुना लेकी ..... आता कुरीअर्वाला येतो .....भावना आटल्या आहेत .पत्रच लिहावेसे वाटात नाही ..सर्वच महाग झाले आहे ..भावना पोहचायला किती वेळ लागतो ..आजच्या काळात संवादाची इतकी माध्यमे आसताना .....बरे ते जाऊ द्या ... असेच पत्रुतर करावे .,हि विनंती ..बाकी क्षेमकुशल ...ठेवतो लेखणी हाताला कळ आली आणि काळजात देखील
सर्वांनी काळजी घ्या ....
ता. क . ;- पाऊस जोरात पडतोय ..... सर्दी होईल आसे वागू नका
आपला ..चेहरापुस्तक मित्र ..राजेंद्र

1 टिप्पणी: