रविवार, ६ मार्च, २०११

चिमणी आणि ती ............. by Rajendra Banait on Saturday, 22 January 2011 at 00:37


ती भेटली बर्याच दिवसांनी ....घाईत आहे मी  बोल पटकन ....मी  म्हणालो काही बोलायचेय .....मग बोल ना.......मी आता नवीन घर घेतले  आहे ...कर्ज काढून ..१० -१२ वर्ष्ये  लागतील  कर्ज फेडायला ....बर  मग ....ती बरीच घाईत दिसते  आहे  म्हणून  मी म्हणालो .....काही  नाही वास्तुशांतीच्या  वेळी  तुझी  आठवण आली  होती ...तुझ्या  आवडीच्या  कोथांबिरीच्या  वड्या केल्या   होत्या ......माझ्या  मुलाला  ओरडून  सांगितले  अरे  चिमणीला  खाऊ  घातली  का ...?   बायकोला  कळले ..ती कसनुसे हसली .....तू मला नेहमी म्हणायची ...मी जरी तुझ्या आयुष्यात  नसले   तरी   तू  आठवणीने  आवडीच्या खाण्याच्या  वेळी  तू आठवणीने  तू एक घास  चिमणीला खाऊ घालत  जा ....म्हणजे   तो  घास  मला पोहचेल ......गेली १२ -१३ वर्ष्ये मी हे पाळतो  बरे का  ..मी  तिला   हे सर्व सांगितल्यावर ....ती गोड हसली ..नजर  बदलून  म्हणाली ...तू  असाच  वेडा  राहणार  कसे  होणार  रे तुझे  काही कळत नाही ?  काही पैसे लागले  तर सांग बरे का ..लाजू  नको  हं...........
..............................................मी मनात म्हणालो .......तू असती तर घराच्या  अंगणात  खूप  चिमण्या  आल्या असत्या .....आपण  मिळून त्यांना   दाणे  टाकले  असते .....आज सारेच बदलले आहे ......ती म्हणाली ..निघते  रे ......फार  उशीर झालाय  ....माझा नवरा ..मुले   वाट पाहत  असतील .....जाते  मी ....ती डोळ्यात डोळे  न घालता चिमणीसारखी  भुर्र उडून  गेली ......................मी तसाच कोरडा  उभा खाली हाताने............................................... रिकाम्या  मनाने......
....................कानात ...डोक्यात फक्त भुर्र उडल्याचा पंखांचा आवाज ...................कितीतरी वेळ...... 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा