रविवार, ६ मार्च, २०११

भालचंद्र नेमाडे यांची पदमश्री .....---- एक दंतकथा by Rajendra Banait on Thursday, 27 January 2011 at 22:59


फार पूर्वीची गोष्ट आहे ....कोसालाकार  भालचंद्र नेमाडे   साहित्यिक वर्तुळात बुद्धिमान म्हणून प्रसिद्ध होते ....त्यावेळी  पु .ल....आरती प्रभू ....कुसुमाग्रज ...असे सगळे काहीना काही भारी लिहित होते ....काही लिटील म्यागेझीन काढत बसले होते ...तर काही मौजचे लेखक म्हणून मिरवत होते .....दलित..ग्रामीण ...असे  वाद उफाळत होतेच .....तेव्हा  पांडुरंग सांगवीकर म्हणाला ....आता  माझ्या लेखणीने समाज बदलायाचा प्रयत्न करतो .....इकडे पारू सावनुर ग्रेसचे चर्चबेल वाचण्यात मग्न होती ....ती  ते वाचत असताना ....देशी  साहित्य ...असा  गांधीवादी जोर पांडुरंगाने लावला ......अनेकांवर देखणी टीका करायचे स्वयंवर त्याने करायचे ठरवले ....काही झाले का देशी ......असा  हा देशी पांडुरंग मुंबईत अवतरला ....
अनेकांना  तो  उद्धट वाटत होता ....पण आपल्या खानदेशी पाण्याचा जोर त्याने असा काय लावला .....कि बरेच लेखक हा आला कि पळून जायचे .......आरती प्रभू या भोळ्या कवीला -लेखकाला ..काळा घोडा परिसरात असे काही भोसाडले कि ...आरती प्रभू गप्पं होऊन चालू लागले ....तर मागून पांडुरंग  म्हणतो ...वास्त्ववता हवी ...पैसे कमवायला  हवे .....मराठी साहित्य भराला आलेला तो काळ ........
................पण साहित्यात खूप राजकारण होते ...ग्रुप  होते ....फार कमी लोकांचे कौतुक  व्हायचे ......पुरस्कार   मिळणे  म्हणजे  फार मोठी गोष्ट .....तिथेही लॉबिंग ....
मराठीत साहित्यिकांना पुरस्कार केव्हा  मिळत  तर  ते म्हातारे झाल्यावर ......,त्यांच्या लेखनाचे कौतुक केव्हा होत  तर   ते मेल्यावर .......हे   वास्तव  लक्षात आल्यावर  पांडुरंगाने गढवाली भाषा शिकण्याचा  प्रयत्न  केला .....देशी  साहित्य कुठे  आहे तर ...भारतातल्या  खेड्यांमध्ये ....रा . भी . जोशी सारखी मजल-दरमजल  करत पांडुरंग काही ट्रिक्स शिकून हिमाचल प्रदेशात बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत  राहिला ......त्याला  महाराश्र्ताची आठवण  यायची  ती पत्रे आल्यावर  मग तो देशी संताप व्यक्त करत असे ....
पांडुरंगाला  म्हणावे तसे कौतुक न झाल्यामुळे  तो आतल्या आत खंतावला  होता ......मराठीतील अनेक मंडळीनी त्याचा योग्य सत्कार न केल्याने  त्याला फार अतीव दुख झाले .....मग त्याने हिंदू हि आपली  जुनी  जाहीर  केलेली  कादंबरी  लिहिण्यास  सुरवात  केली ...बर्याच दिवसांनी हि कादम्बरी   प्रकाशित झाली ....
गढवाली लोकांनी खूप मोठा सन्मान केला ......हिमाचल प्रदेशात  अनेक राजकारणी ...समाजकारणी ...साहित्यिकांनी  पांडुरंगाचे  नाव  भारत सरकारला  कळवले .....कोणतीही ग्रुप्बाजी आणि कोणताही जातीभेद न व्होता ...त्याचे नाव पद्मश्री पुरस्काराला  सुचवण्यात आले .......
मोठ्या भिंगाच्या चष्म्यातून पांडुरंग आसवे टिपू लागला ....मनात  म्हणाला ......हे जर महाराष्ट्र  सरकारने केले असते  तर ? लेखकाला  त्याच्या मातीतून  दाद मिळाली असती  तर ......हाच  पुरस्कार आपण मराठी  माणसाला ..मराठी साहित्यिकांना ....सर्व  देशी  जाणीव  ठेवणाऱ्या  प्रतेक   भूमिपुत्राला   अर्पण  केला असता .....
......................कोणताही निषेध न नोदवता  पांडुरंग सांगवीकरने   हा पुरस्कार  स्वीकारला .......
(हा लेख वाचून जर कोणाला दुख झाले तर मला  माफ करावे  हि नम्र  विनंती ...--------.राजेंद्र  बाणाईत...)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा