परवा कविता महाजन यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आला ..थोडी धाक-धुक ...पण ५ मिनिटाने सारे काही सुरळीत ..मनात म्हटलो ..अरे ,या तर आपल्या मराठीच्या बाई वाटतात ...कोणताही अभिविनेश नाही ..साधे -सरळ बोलणे ...मधूनच गूढ हसणे .....एखाद्या सर्वद्न्य योग्यासारखे ....इतकी पुस्तके लिहिली पण थोडा देखील गर्व नाही ..मुख्य म्हणजे माज नाही .., वर्गातल्या मुलांना प्रेमाने समजून सांगण्यासारखा स्वर आणि मधूनच थोडासा करारीपणा -कडकपणा देखील ....बरीच लेखक -कवी आजपर्यंत अनुभवलीत ..काहीच रोख -ठोक ....त्यातीलच एक म्हणजे ..कविता महाजन ..! फार चांगल्या गोष्टी सांगितल्या ..आणि योग्य सूचना देखील ....,, मधेच घरातील लोकाची विचारपूस .....कोणताही अहंकार नाही ..स्वरात काहीसा पोक्त पणा...आवाजात मधूनच एक प्रकारचा प्रवाही आवेग ..,त्यांना काय सांगायेचेय ते आपण नीट कान देऊन ऐकायचे ..,बालपणच्या मराठीच्या बाई अश्याच होत्या ...!मला एक -दोन शंका होत्या ..त्याची सरळ उत्तरे त्यांनी दिली ...आणि त्याच्या वालवर मी तीनदा जरा जास्तीचे लिहिले होते ..त्याबद्दल मी खंत व्यक्त केली ..पण यांनी ते फार मोठ्या दिलदारीने समजून घेतले ..आणि एखाद्या नवख्या मुलाला तुझी चूक झालीच नाही असे दाखवले ...असा मोठेपणा त्यांच्याकडे फार आहे .....आणि यावर पाघरून टाकायचे कसे ..? तर मधेच गूढ --आणि ...समजूतदार हसणे ..फार कमी जणांना जमते हे ...!काही लेखकांची नावे सांगितली ..तुम्ही ह्यांना वाचाच ..वैगेरे ..! तुम्ही ठाण्याला या असे निमंत्रण ...!मी मुबईला घाबरतो आसे म्हटल्यावर परत गूढ हसल्या ... बरे मी तुम्हाला पुण्यात आल्यावर भेटेल अश्या म्हणाल्या ..! दुख कसे पचवावे ..किंवा त्यावर मात कशी करावी .यावर काही टिप्स दिल्या ..!!.कोण आहे आजच्या जमान्यात तुम्हाला एकूण घेणारा ..??? माझी फेस्बुक्वरची मानलेली बहिण ,,(साक्खीसारखी वाटणारी ) अनुसया वाडेकर (दीदी ) हिच्याविषयी मी चवकशी केली ..त्यावर पुन्हा पोक्त हसून मला तिच्याविषयी सांगितले ....!!!आणि मग आम्ही संवाद थांबवला ...जवळ -जवळ एक तास आम्ही बोलत होतो ...माझे १९९१ पासूनचे त्यांच्याशी बोलण्याचे स्वप्न साकार झाले ......आणि व्यक्तिगत जीवनात परत एकदा बालपणीच्या मराठीच्या बाई परत काही बाबी समजून सांगण्यासाठी देवाने पाठवल्या .......!!!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा