रविवार, ६ मार्च, २०११

बालपणीचा खेळ ..कब्रस्तान By Rajendra Banait · Wednesday, 28 July 2010


मी नगरला इयत्ता ३रित असताना ची गोष्ट आहे .... मी शालेच्याजवळ असलेल्या क्रिस्ती स्मशानभूमीत जात असायचो .... लाकड्याच्या पेटीत मृतदेह आणून तो पुरण्याचा .....आणि प्रार्थना म्हणयचा कार्यक्रम कित्येकवेळा मी पहिला ...माझे मनाला ते थोडेसे कळत होते ..काही दिवसांनी मी घरी आल्यावर मला जर खेळातून कोणी हाकलून दिले कि , मी मुंगळे मारायचो आणि त्यांना काडेपेटीत टाकायचो आणि जमिनीत पुरायचो .....त्यावर कुल्फिच्या काडीचा क्रूस तयार करून जमिनीत पुरायचो ....अश्या दहा -पंधरा काडेपेट्या जमिनीत पुरून मी माझी स्मशानभूमी तयार करायचो ......थोडे लांब अंतरावर जाऊन हि स्मशानभूमी पाहत राहायचो .....आणि का कुणास ठाऊक खूप रडायचो ..........नन्तर खेल विस्कुटून टाकायचो ......या कृतीचा अर्थ मला थोडा थोडा लागला आहे ....आपल्यापैकी कोणाला लागला तर प्रतिक्रिया जरूर कळवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा