रविवार, ६ मार्च, २०११

मधेच तिचे अवखळ हसणे by Rajendra Banait on Saturday, 14 August 2010 at 02:36


हा नवा खेळ संवादाचा ..........हा पुन्हा पोरखेळ बेजबाबदार जगण्याचा .................हा फेसबुकवर बसण्याचा छंद कॉलेजकॅन्टीन मध्ये पडीक राहण्यासारखा......................जीवनाचे कित्येक तास बंक करून गप्पा मारण्याचा .................हा थोडासा दुबळा पळपुटेपणा........................जीवनापासून पळण्याचा...........थोड्याश्या कुचाळक्या................... थोड्याशा लायनी मारण्याचे कार्यक्रम .......................थोडेसे वाट पाहणे ...................थोडेसे स्वतालाच सावरून बसने ...आणि उसने अवसान आणून एक कविता लिहिणे .....................मैफिल रंगात आलीय ......................आता इतक्यात सोडून जाता कसे येईल .......................बघ ती कशी अवखळ हसलीय ........................................................मधेच ..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा