भर उन्हाचा .......वाहत्या रस्त्याच्या कडेला तो खुशाल झोपला होता .....कोणालाही वाटेल त्याला पाहून हा नक्की दारुडा आहे .....गेली काही वर्ष्ये तो कुठेही जेवायचा ...आणि झोपायचा देखील .....कार्पोरेशनच्या कृपेने बरीच झाडे लावली होती ...त्यात दिखावा म्हणून कृत्रिम हिरवळ .....त्याच्या सारखे कसे झोपतात भर रस्त्यावरच्य कडेला ...समजत नाही .... हा आपला सकाळी वाचलेला पेपर अंथरून झोपलेला ....तोंडातून लाळ गळ्तीय...त्यात तोंडावर एक -दोन माश्या बसलेल्या ....हा पठ्ठ्या मात्र भर उन्हाचा घोरतोय........ कळत नाही ....त्याच्या अंगाखालच्या पेपर मधल्या काही बातम्याची शीर्षके फार मजेशीर होती ......केनियाचा धावपटू पहिला .....पेट्रोलला पर्याय म्हणून अल्खाहोलचा वापर करायचा शासनाचा विचार ...संजय दत्तला पुन्हा अटक ...बेळगावात पुन्हा दंगल ....सातारा शहरात बांगलादेशी सापडला .....झीनत अमानला जीवन गौरव .....आज गुरुपुष्यामृत योग आहे गाडगीळ मधेच सोने खरेदी करा ,मजुरी नाही .......निम्मेपान रंगीत जाहिरात ...ह्याने माशी नाकात गेल्याने कशीतरी कूस बदलली ......जोराचा वारा आला आणि पेपरचे ते मुख्य पान उडून गेले
गाड्याचे हॉर्न कर्णकर्कश आवाज काढत होते .......त्यातून रस्त्याच्या एका बाजूने एक सरबतवाल्याची हातगाडी तो जिथे झोपला तिथे येवून थांबली ....त्या गाडीचा मुसलमान मालक फार हौशी असावा असे वाटत होते ..त्याने गाडीला ब्याटरी लावून कारटेप लावला होता ....दोन स्पीकर एक वुफर ...गाणे लागले होते .....उड जायेगा पंछी इक दिन रहेंगा पिंजडा खाली ....पिंजडा खाली ......दोन -तीन टगी पोरे सायकलवरून चालली होती ...सरबताच्या गाडीपाशी येवून थांबली .....शिकनजेबी सांगून गाडीवाल्याची थोडीशी टर उडवण्याची हुक्की एकाला आली ....कोनसे गाव के ? सरबत बेचके कितना पैसा मिलता..?...याच्या कलकलाटाने याची झोप चाळवली...त्यात एका पोराने पाण्याची चूळ याच्या अंगावर उडवली ....तरी हा अर्धवट झोपेत यांना म्हणाला ...भाऊ झोपू द्याना ...कह्याला उठवता ...एका टग्याला त्याची दया आली म्हणाला ...मराठवाड्याचा का रे तू ..? हा झोपेत म्हणाला ...व्हय....गाडीवर गाणे लागले होते .....तुम तो टेहरे परदेसी साथ क्या निभाओंगे .......टग्याने जबरदस्तीने गाडीवाल्याला याला सरबत द्यायला सांगितले .....सरबत पिल्यावर हा जरा जागेवर आला ....एकाने विचारले ..काय रे ,,,किती शिकला .? हा म्हणला ..बी .ए . हिस्ट्री .....सारे क्षणभर गप्प झाले ....
काही वेळाने हा परत तिथेच काही काळ पसरून राहिला ...कार्पोरेशनचे लोक झाडांना ,हिरवळीला पाणी द्यायला आले ... त्यांनी याला तिथून हाकलून दिले ..
.
....................हा काहीसा झोपेत एका सिंमेटच्या बाकावर येवून बसला ......घराची आठवण येऊन पोटात एकच गलबला उसळला ....सरबातावाल्याच्या गाडीवरून फार लांबून स्वर आदळत होते ...क्या करोंगे तुम आखिर मेरी याद आतेही...आसुओके बारिशमे ये तुम्भी भिग जाओगे ...तुम टेहरे परदे ssssssssसी...............तुम टेहरे परदे ssssssssसी.....तुम टेहरे परदे ssssssssसी....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा